मान्सूनपूर्व कपाशीच्या लागवडीला सुरुवात

कपाशीचा पेरा वाढण्याची शक्यता

    दिनांक :15-Jun-2024
Total Views |
उंबर्डा बाजार, 
उंबर्डाcotton crops बाजार परिसरात शेती मशागतीची कामे जवळपास पुर्ण झाली असल्याने व १२ जून रोजी झालेल्या पावसामुळे कपाशीच्या लागवडीला सुरुवात झाली आहे. यावर्षी मान्सून वेळेवर दाखल होणार असा अंदाज हवामान खात्याचे भाकीत होते. त्यामुळे शेतकर्‍यांनी पैशाची जुळवा जुळव करून बियाणे खरेदी केले. गुरुवार दि. १४ जून रोजी आलेल्या पावसाच्या सरीवर शेतकर्‍यांनी कपाशीच्या लागवडीस सुरुवात केली आहे.
 

sdsds 
पैशाचीcotton crops चणचण असताना सुद्धा जुळवाजुळव करून शेतीच्या मशागतीची कामे उरकून घेण्याच्या कामाला बळीराजाने प्राधान्य दिले. १२ जून रोजी आलेल्या पावसाने शेतकरी मंडळीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून समाधानकारक पावसाने उंबर्डा बाजार सह परिसरात अनेक शेतकर्‍यांनी शेतात कपाशीच्या लागवडीला सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतमजुरांना रोजगार मिळाल्याने मजूर वर्गाला दिलासा मिळाला आहे.ग्रामीण भागात रोजगार मिळत नसल्याने मजूर वर्गानी शहराकडे धाव घेतली होती. मात्र गावाकडे झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतीचे कामे करण्यास सुरुवात झाल्यामुळे मजूर गावाकडे येतांनाचे चित्र परिसरात दिसत आहे.