वाशीम,
Jai Mahesh माहेश्वरी समाजाच्या वंशोत्पती दिनानिमीत्त महेश नवमीच्या पावन पर्वावर महेश नवमी उत्सव समितीच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या रॅलीत माहेश्वरी समाज बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी जय महेश च्या जयघोषाने वाशीम नगरीत दुमदुमून गेली होती.
महेश नवमीनिम्मित १५ जून रोजी सर्वप्रथम स्थानिक श्रीराम मंदीर येथे भगवान महेशचे अभिषेक पुजन करण्यात आले. पुजेचे यजमान व राधेश्याम हेडा व संदीप बाहेती होती. तद्नंतर भव्य शोभायात्रा काढण्यात आली. महिलांनी डोक्यावर कलश घेवून शोभायात्रेत सहभाग नोंदविला. स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे समाजसेवी गिरीधारीलाल सारडा व अनिल मानधने यांच्याहस्ते पुतळयाला हार्रापण व पुजन करण्यात आले. शोभायात्रा काटीवेश, जुने न.प. चौक मार्गे महेश भवन पर्यंत काढण्यात आली. सदर शोभायात्रेत शारदा सोनी व दिपाली तोतला यांनी भगवान महेश व पार्वतीची भूमिका साकारली.Jai Mahesh परशुराम भवन येथे अशोक हेडा, दिलीप हेडा, रोहित हेडा, कुणाल हेडा व परिवाराच्या वतीने समाज बांधवांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. महिलांनी लाल साडी व पुरूषांनी पांढरे वस्त्र परिधान करून शोभायात्रेत सहभाग नोंदविला.संपूर्ण शहरात महेशमय वातावरणाची निर्मीती झाली. युवकांनी ढोलाताशांवर नृत्याचा आनंद घेतला. जय महेशचा जयघोष करण्यात आला.