1.15 लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पाठ्यपुस्तके

शिक्षण विभागाचे नियोजन पुर्ण

    दिनांक :16-Jun-2024
Total Views |
गोंदिया, 
जिल्ह्यात free books यंदाच्या शैक्षणिक सत्राचा प्रारंभ 26 जून रोजी होणार आहे. पहली ते आठविच्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत मिळणारी पाठ्यपुस्तके वेळेवर हाती पडावी यासाठी शिक्षण विभागाचे नियोजन पुर्ण झाले आहे. शाळेच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांच्या हाती पाठ्य प्फस्तके पडतील अशी अपेक्षा पालकांकडूनही व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील 1 लाख 14 हजार 817 विद्यार्थ्यांसाठी 1 लाख 6 हजार 900 पुस्तकांचा साठा तालुकास्तरावर पोहोचती करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा 26 जूनपासून सुरू होत आहेत. पहिल्या दिवशी पुस्तक दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी शिक्षण विभाग सज्ज आहे. जिल्ह्यातील 1 लाख 14 हजार 817 मुलांसाठी 1 लाख 6 हजार 900 पुस्तके उपलब्ध झाली आहेत.
 
 

free books 
पहिली ते free books आठवीत शिक्षणारे कोणतेही बालक पुस्तकापासून वंचित राहू नये, त्याला पुस्तका अभावी शिक्षणात अडचणी येऊ नये. त्याचबरोबर शाळेतील सर्व दाखलपात्र मुलांची 100 टक्के उपस्थिती टिकविणे, गळतीचे प्रमाण शून्यावर आणण्याचे शासनाचे धोरण आहे. यासाठी पुस्तक देण्याची योजना राबविली जाते. शासकीय योजनेंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये शिकणार्‍या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविली जातात. जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या पात्र विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी वितरण करण्याचे नियोजन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. पाठ्यपुस्तक वितरणचा दिवस पुस्तक दिन म्हणून साजरा करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद शिक्षण विभागाने यंदा इयत्ता पहिली ते पाचवीतील 72 हजार 321 विद्यार्थ्यांसाठी 62 हजार 276 पाठ्यपुस्तके संच, इयत्ता पाचवी ते आठवीतील 42 हजार 496 विद्यार्थ्यांसाठी 42 हजार 624 पाठ्यपुस्तकांच्या संचाची मागणी बालभारतीकडे केली होती. 14 हजार 817 विद्यार्थ्यांसाठी 1 लाख 6 हजार 900 पुस्तकांची मागणी नोंदविण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाकडे पुस्तके पोहोचली असून ती पुस्तके तालुका स्तरावर गट शिक्षणाधिकार्‍यांपर्यंत आधीच पोहोचती करण्यात आली आहेत.