अरेरे ! पुरात बैलगाडी गेली

17 Jun 2024 17:28:09
दुसरबीड, 
जोरदार FLOODपावसामुळे नदीला आलेल्या पुरात बैलगाडी वाहून गेल्याची घटना दि. 15 जून रोजी सायंकाळी सावरगाव तेली तांडा येथे घडली. यामध्ये एका बैलाचा मृत्यू झाला असून दुसर्‍या बैलाचा जीव वाचला आहे.
 

rtrtr 
 
सावरगावFLOOD तेली तांडा येथील शेतकरी सुभाष सोमला चव्हाण हे मशागत करून सायंकाळी बैलगाडीने घरी परतत होते. त्यावेळी परिसरात जोरदार पाऊस झाल्याने सावरगाव तेली किनगाव जव दरम्यान असलेला नदीला अचानक पूर आला. या पुरामध्ये बैलगाडी वाहून गेली. त्यामुळे एका बैलाचा मृत्यू झाला. या घटनेत 45 हजार रुपयांचे नुकसान झाले. एक बैल व सुभाष चव्हाण थोडक्यात बचावले. पेरणीला सुरुवात झाली असल्याने एका बैलाचा मृत्यू झाल्यामुळे शेतकर्‍यावर संकट कोसळले आहे. तलाठी वसुदेव जायभाये यांनी पंचनामा करून तहसील लोणार येथे अहवाल पाठवला आहे. यावेळी मिलिंद चव्हाण, मधुकर मिसाळ, अरविंद राठोड, ज्ञानेश्वर कायंदे आदी उपस्थित होते. ऐन पेरणीच्या दिवसात अचानक शेतकर्‍यांचा बैलाचा मृत्यू झाल्यामुळे मदत देण्याची मागणी होत आहे.
Powered By Sangraha 9.0