गडचिरोली पोलिस भरतीत होणार अत्याधुनिक यंत्राचा वापर

    दिनांक :17-Jun-2024
Total Views |
गडचिरोली, 
Gadchiroli Police Recruitment : गडचिरोली पोलिस दलामार्फत पोलिस शिपाई चालक भरती 2022-2023 (प्रत्यक्ष भरती प्रक्रिया-2024) 10 जागांसाठी तसेच गडचिरोली पोलिस शिपाई भरती प्रक्रिया 2022-2023 (प्रत्यक्ष भरती प्रक्रिया 2024) 912 जागांकरीता उद्या बुधवारी, 19 जुनपासून राबविण्यात येणार आहे. दोन्ही भरतीसाठी मैदानी चाचणीची तारिख जाहिर झालेली असून 19 जून ते 12 जूलै या कालावधीत पोलिस मैदानावर आयोजित करण्यात आलेली असून या भरती प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी अत्याधुनिक यंत्राचा वापर करण्यात आला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक, नीलोत्पल यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक कुमार चिंता उपस्थित होते.
 
 
Gadchiroli Police Recruitment
 
गडचिरोली पोलिस शिपाई चालकाच्या 10 पदाकरिता 2258 उमेदवारांनी अर्ज सादर केले असून यामध्ये1967 पुरुष व 291 महिला उमेदवार आहेत. तसेच पोलिस शिपाईच्या 912 पदाकरिता एकुण 24570 उमेदवारांनी अर्ज सादर केले असुन यामध्ये 16803 पुरुष तर 7767 महिला उमेदवार आहेत. पोललिस शिपाई चालक पदाच्या एकुण 10 जागांपैकी अनुसुचित जाती1, अनुसुचित जमाती 2, भज (ब) 1, भज (क) 1, इमाव 2, एसईबीसी 1, इडब्ल्युएस 1, अराखीव 1 अशा स्वरुपात पदभरती घेण्यात येणार आहे. ही प्रक्रिया 19 जून ते 20 जून या कालावधीत पुर्ण करण्यात येणार आहे. यासोबतच पोलिस शिपाई पदाच्या एकुण 912 जागांपैकी अनुसुचित जाती 121, अनुसुचित जमाती 210, विज (अ) 54, भज (ब) 50, भज (क) 57, भज (ड) 46, विमाप्र 46, इमाव 158, एसईबीसी 50, इडब्ल्युएस50, अराखीव 70 अशा स्वरुपात पदभरती घेण्यात येणार आहे. ती 21 जून ते 12 जुलै या कालावधीत पुर्ण करण्यात येणार आहे.
 
 
Gadchiroli Police Recruitment : पोलिस शिपाई चालक पदाकरीता दरदिवशी सरासरी 1000 उमेदवारांची व पोलिस शिपाई पदाकरीता दरदिवशी सरासरी 1300 उमेदवारांची शारिरिक चाचणी घेण्यात येणार आहे. सर्व उमेदवारांना पोलिस शिपाई व चालक पोलिस शिपाई पदाच्या मैदानी चाचणी परीक्षेचे प्रवेशपत्र हे महाआयटी विभागामार्फत ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करण्यास उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तरी, सर्व उमेदवारांनी आपले मैदानी चाचणी परीक्षेचे प्रवेशपत्र वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घ्यावे. तसेच प्रवेशपत्रावर नमूद असलेल्या मैदानी चाचणी परिक्षेची तारिख लक्षात घेऊन चाचणीसाठी आवश्यक कागदपत्रासह पोलिस मुख्यालय गडचिरोली येथे उपस्थित राहावे.
 
 
सदर पदभरती प्रक्रिया ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पुर्णपणे पारदर्शक पध्दतीने करण्यात येणार असुन यामध्ये उमेदवारांची छाती-उंची या शारीरीक मोजणीकरीता पीएसटी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. तसेच उमेदवारांची 1600 मीटर धावणे (पुरुष), 800 मीटर धावणे (महिला), 100 मीटर धावणे (पुरुष व महिला) च्या चाचणीसाठी बॉस्ड (आरएफआयडी) टेक्नॉलाजीचा वापर करण्यात येणार आहे. यासोबतच गोळा फेक चाचणीसाठी प्रीस्म टेक्लॉलाजीचा वापर करण्यात येणार आहे. मैदानी चाचणीमध्ये उत्तीर्ण होवुन लेखी परीक्षेकरीता पात्र उमेदवारांची बायोमॅट्रीक पध्दतीने हजेरी घेवुन पडताळणी करण्यात येणार आहे. जर पावसामुळे एखादे दिवशी मैदानी चाचणी होऊ शकली नाही तर त्यांना पुढची तारीख दिली जाईल. सोबतच काही उमेदवारांना वेगवेगळया पदाकरीता एकापेक्षा जास्त ठिकाणी आणि एकाच दिवशी मैदानी चाचणीकरीता हजर राहावयाचे असल्यास अशा उमेदवारांना दुसरी तारिख दिली जाईल.
 
 
Gadchiroli Police Recruitment : उमेदवारांनी कुठल्याही प्रलोभन किंवा आमिषाला बळी पडू नये तसेच कोणीही आमिष किंवा प्रलोभन देत असेल तर पोलिस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथील समाधान कक्ष, दुरध्वनी क्र. 8806312100 यावर तसेच उपविभागीय कार्यालय/पोस्टे/ उपपोस्टे/पोलिस मदत केंद्रात माहिती द्यावी, असेही आवाहन यावेळी पोलिस अधिक्षक नीलोत्पल यांनी केले आहे.