१८ वर्षांत २१ ''बदल्या'' पण, मुंढे नाही ''बदलले''!

Tukaram Mundhe-IAS असा आहे ""बदलीनामा""

    दिनांक :18-Jun-2024
Total Views |
मुंबई,
 
 
 
Tukaram Mundhe-IAS महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेत तुकाराम मुंढे हे नाव इतिहास रचणार आहे. कधी आपल्या धडाडीच्या कामामुळे तर कधी राजकीय नेतृत्वासोबत झालेल्या वादांमुळे तर कधी रोखठोक भूमिका घेत, स्पष्ट निर्णय घेतल्यामुळे राज्यातील सर्वात चर्चेत राहिलेले सनदी अधिकारी म्हणजे आयएएस तुकाराम मुंढे ! Tukaram Mundhe-IAS राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात आपल्या स्पष्ट भूमिकेमुळे कायम चर्चेत राहिलेल्या तुकाराम मुंढे यांच्या नावावर आता विक्रम नोंदविला जाण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे. तुकाराम मुंढे आणि बदली हे समीकरण महाराष्ट्रातील जनतेला काही नवं नाही. आपल्या एकूण १८ वर्षांच्या कार्यकाळात मुंढे यांची एकविसावे बदली झाली आहे. Tukaram Mundhe-IAS गेल्याच वर्षी पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासाच्या सचिवपदाची जबाबदारी घेणाऱ्या तुकाराम मुंढेंची पुन्हा एकदा बदली झाली आहे. नव्या ठिकाणी रुजू झालेले तुकाराम मुंढेंनी आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमध्ये कोणताही बदल केला नाही, हे विशेष! 
 
 

Tukaram Mundhe-IAS 
 
 
Tukaram Mundhe-IAS आता, विकास आयुक्त (असंघटित कामगार) खात्याच्या सचिवपदी त्यांना नियुक्त करण्यात आलं आहे. त्यांच्या सध्याच्या पदाचा कार्यभार राजेश कुमार यांच्याकडे सोपवण्याच्याही सूचना त्यांना बदली आदेशात देण्यात आल्या आहेत. मुंढेंनी सोलापूरचे उपजिल्हाधिकारी म्हणून ऑगस्ट २००५ मध्ये आपल्या प्रशासकीय कारकिर्दीला सुरुवात केली. Tukaram Mundhe-IAS त्यानंतर, विविध जिल्ह्यात जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि सचिव अशा जबाबदारीच्या पदांवर त्यांनी कारकीर्द गाजवली. गेल्या वर्षीच्या जून महिन्यात राज्याच्या पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासाच्या सचिवपदी त्यांची बदली करण्यात आली होती. Tukaram Mundhe-IAS विशेष म्हणजे त्याअगोदर अवघ्या एका महिन्यापूर्वीच मराठी भाषा विभागात बदली करण्यात आली होती. आता, आज पुन्हा त्यांनी बदली करण्यात आली आहे.
 
 
 
प्रशासकीय सेवा अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांच्या आदेशानुसार राज्याच्या विकास आयुक्त (असंघटित कामगार) सचिवपदी त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच दुध उत्पादक संघाच्या मालकांनी मंत्रालयात येऊन त्यांचा सत्कार केला होता. Tukaram Mundhe-IAS कर्मचाऱ्यांना कडक शिस्त लावण्यासाठी मुंढे जी पावले उचलतात, तीच त्यांच्या बदल्यांसाठी कारण ठरत असल्याची चर्चा आहे. सामान्य लोकांना जरी तुकाराम मुंढेची कार्यशैली आवडत असली तरी सत्ताधारी आणि राजकारण्यांसाठी मात्र ती अडचणीची ठरत असल्याचं दिसतं. दरम्यान, आयएएस अथवा आयपीएस अधिकाऱ्यांना एकाच ठिकाणी किमान दोन ते अडीच वर्षे सेवा बजावतात. Tukaram Mundhe-IAS पण, मुंढे याला अपवाद ठरत आहेत. आज झालेली बदली ही चालू वर्षातील दुसरी बदली आहे. 
 
तुकाराम मुंढेंचा ''बदलीनामा''
ऑगस्ट २००५ - प्रशिक्षणार्थी, उपजिल्हाधिकारी सोलापूर
सप्टेंबर २००७ - उप जिल्हाधिकारी, देगलूर उपविभाग
जानेवारी २००८ - सीईओ, जिल्हा परिषद नागपूर
मार्च २००९ - आयुक्त, आदिवासी विभाग
जुलै २००९ - सीईओ, वाशिम
जून २०१० - सीईओ, कल्याण
जून २०११ - जिल्हाधिकारी, जालना
सप्टेंबर २०१२ - विक्रीकर सहआयुक्त मुंबई
नोव्हेंबर २०१४ - सोलापूर जिल्हाधिकारी
मे २०१६ - आयुक्त, नवी मुंबई महापालिका
मार्च २०१७ - मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमपीएल, पुणे
फेब्रुवारी २०१८ - आयुक्त, नाशिक महापालिका
नोव्हेंबर २०१८ - सहसचिव, नियोजन
डिसेंबर २०१८ -प्रकल्प अधिकारी, एड्स नियंत्रण, मुंबई
जानेवारी २०२० - आयुक्त, नागपूर महापालिका
ऑगस्ट २०२० - सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई
जानेवारी २०२१ - राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत
सप्टेंबर - २०२२ - आयुक्‍त आरोग्‍य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान
जून २०२२ - मराठी भाषा विभाग
जुलै २०२२ - पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभाग
जून २०२४ - विकास आयुक्त (असंघटित कामगार)