नाशिक पदवीधरमध्ये झिरवाळ गटाचा ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा

    दिनांक :19-Jun-2024
Total Views |
- अजित पवार यांना धक्का
 
नाशिक, 
राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. नरहरी झिरवाळ यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी संदीप गुळवे यांचे काम करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या. संदीप गुळवे हे उद्धव ठाकरे गटाचे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार आहेत. नरहरी झिरवाळ यांची भूमिका Ajit Pawar अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
 
 
Ajit Pawar
 
Ajit Pawar : काँग्रेसचे नेते आणि मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक अ‍ॅड. संदीप गुळवे यांनी नाशिक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी 1 जून रोजी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला होता. काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांची नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली होती. दोन्ही पक्षाच्या सहमतीतून संदीप गुळवे यांचा पक्षप्रवेश ठाकरे गटात झाला होता. त्यानंतर त्यांना ठाकरे गटाकडून नाशिक शिक्षक मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली होती.
 
 
झिरवाळ यांच्या वाढदिवसानिमित्त संदीप गुळवे यांनी त्यांची भेट देखील घेतली होती. त्यानंतर झिरवाळ यांच्याकडून आता गुळवे यांना पाठिंबा देण्यात आल्याचे समोर येत आहे. त्याचप्रमाणे संदीप गुळवे यांची कामे करण्याच्या सूचना झिरवाळ यांनी कार्यकर्त्यांना दिल्या असल्याची माहिती आहे. अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेमधील अनेक आमदारांनी Ajit Pawar अजित पवार यांना पाठिंबा दिलेला आहे. यामध्ये नरहरी झिरवाळ यांचादेखील समावेश होता. मात्र, त्यांनी आता वेगळी भूमिका घेत संदीप गुळवे यांना पाठिंबा देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.