जिल्ह्यातील शिक्षकांच्या वेतनासाठी ‘इ-कुबेर’ प्रणाली कार्यान्वित

02 Jun 2024 19:42:58
- इ-कुबेर वेतन प्रणालीमुळे जिपच्या साडेसात हजार शिक्षकांना दिलासा
- शिक्षक संघटनांनी केले प्रशासनाचे अभिनंदन

यवतमाळ, 
E-Kuber Pay System : आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे, या तंत्रज्ञानाच्या युगात असाध्य बाबी साध्य होत आहेत. वेतनप्रणालीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून जिल्ह्यातील शिक्षकांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित वेतनाचा तिढा सुटला असून जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील साडेसात हजार शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. शिक्षकांचे वेतन वेळेवर मिळण्यासाठी स्टेट बँकद्वारे ‘ई-कुबेर’ प्रणाली विकसित करण्यात आली. याद्वारे शिक्षकांचे पगार महिन्याअखेर 30 किंवा 31 तारखेला होणार आहे. यासाठी शिक्षकांचे पगार करण्यासाठी या प्रणालीमध्ये प्रशासनाला यश आले आहे.
 
 
y2Jun-Vetan
 
स्टेटबँकेद्वारे कार्यान्वितE-Kuber Pay System  ई-कुबेर प्रणालीचे सनियंत्रण हैदराबाद येथून केल्या जात आहे. त्यामुळे पगार वेळेवर होत असल्याने जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षक संघटनांनी समाधान व्यक्त करुन प्रशासनाचे आभार मानले आहे. जिल्ह्यातील कित्येक वर्षांपासून शिक्षकांचे पगार त्वरित करण्यात यावे यासाठी विविध संघटनांनी निवेदने व धरणे आंदोलनेसुद्धा केली. वेळप्रसंगी कोषागार कार्यालयापर्यंत पाठपुरावा केला होता. वेळेवर पगार होत नसल्यामुळे उचल केलेल्या कर्जाचे हप्ते वेळेवर संबंधित बँकेला मिळत नसल्यामुळे शिक्षकांना भुर्दंड सोसावा लागत होता.
 
 
E-Kuber Pay System : या प्रणालीमुळे वेळेवर पगार मिळत असल्याने जिल्ह्यातील शिक्षकात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबद्दल विविध शिक्षक संघटनांनी प्रशासनाचे आभार व्यक्त करून अभिनंदन केले. यामध्ये विविध शिक्षक संघटनांतर्गत नंदकिशोर वानखेडे, पुंडलिक रेकलवार, शरद घारोड, राजहंस मेंढे, प्रकाश येरमे, महेंद्र वेरुळकर, पुंडलिक बुटले, तुषार आत्राम, पुरुषोत्तम ठोकळ, विनोद डाखोरे, सुनील मनवर, किरण मानकर, डॉ. सतपाल सोवळे, नदीम पटेल, कुलदीप डंभारे, सचिन तंबाखे, हयात खान, इनायत खान, राजकुमार भोयर, रवी आडे, डॉ. संदीप तंबाखे, राधेश्याम चेले, सुनील राठोड, आसाराम चव्हाण, शशिकांत लोळगे, सचिन सानप, विठ्ठल आरू, प्रवीण दरेकर, डॉ. अवधुत वानखडे, स्वप्निल फुलमाळी यांनी प्रशासनाचे कौतुक केले आहे. असे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख राजहंस मेंढे यांनी कळविले आहे.
Powered By Sangraha 9.0