कळंबा कारागृहात मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची हत्या

    दिनांक :02-Jun-2024
Total Views |
कोल्हापूर,
मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपीची Murder in Kalamba Jail कळंबा कारागृहात निर्घृण खून करण्यात आला. मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान असे मृत कैद्याचे नाव आहे. रविवारी सकाळी कारागृहातील स्नानगृहात आंघोळ करण्यासाठी गेला असता हा प्रकार घडला. न्यायालयीन बंदी आरोपी प्रतीक उर्फ पिल्या पाटील, दीपक खोत, संदीप चव्हाण, ऋतुराज इनामदार, सौरभ सिद्ध या पाच जणांनी ड्रेनेजवरील लोखंडी झाकणाने मारहाण केली. त्यातच मुन्नाचा मृत्यू झाला.
 
 
Kalamba Jail
 
Murder in Kalamba Jail खूनाच्या या प्रकारामुळे कळंबा कारागृहातील सुरक्षा व्यवस्था पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. गांजा सापडणे, पोलिसांनीच गांजा पुरवणे ते ढीगभर मोबाईल सापडत असल्याने कळंबा जेल पुरते बदनाम झाले आहे. मागील काही महिन्यांपासून केलेल्या झाडाझडतीत 80 हून अधिक मोबाईल सापडले आहेत. त्यामुळे कारागृह विभागाचे अपर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी एप्रिल महिन्यात दोन अधिकार्‍यांसह 9 कर्मचार्‍यांना सेवेतून बडतर्फ केले तसेच दोन वरिष्ठ अधिकार्‍यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या होत्या.