शालेय विद्यार्थ्यांना दाखले देण्यासाठी शिबिर : राजेंद्र सुरडकर

    दिनांक :02-Jun-2024
Total Views |
- 13, 19 व 25 जून रोजी शिबिर

उमरखेड, 
दहावी व बारावी परीक्षेचा निकाल लागला. आता विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्यासाठी विविध दाखल्यांची आवश्यकता पडणार आहे. कोलाम आदिवासी लोकांची शासकीय लाभासाठी आवश्यक कागदपत्रे विद्यार्थ्यांना लागणार आहेत. शालेय विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अडचणी येऊ नये म्हणून तहसीलदार Rajendra Suradkar राजेंद्र सुरडकर यांनी उमरखेड तालुक्यातील मुख्याध्यापकांची सभा बोलावली होती.
 
 
y2Jun-Rajendra-Suradkar
 
Rajendra Suradkar : यात 13 जून 19 जून व 25 जून रोजी शिबिर घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सभेला उमरखेड नायब तहसीलदार नकितवाढ, उमरखेड पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी सतीश दर्शनवाढ, महसूल सहायक राजीव यलुतवाड व उमरखेड तालुक्यातील शाळा व महाविद्यालयातील मुख्याध्यापक उपस्थित होते.