पुरातत्त्व विभागाच्या उत्खननामध्ये सापडली शेषशायी भगवान विष्णूची मूर्ती

20 Jun 2024 19:54:52
सिंदखेडराजा,
Department of Archaeology : इतिहास आणि पौराणिक काळाची साक्ष देणार्‍या अनेक वास्तू शहरात उपलब्ध आहेत. मात्र, या पलीकडे जाऊन या शहराचे खरे वैभव काय असेल याची साक्ष देणार्‍या अनेक मूर्ती येथे सुरू असलेल्या उत्खननात आढळून येत आहेत, साधारण एक महिन्यापूर्वी येथे शिवलिंगासह अख्खे शिवमंदिर निदर्शनास आले आहे. आता उत्खननामध्ये शेषनागावरील विश्राम अवस्थेतील भगवान विष्णू मूर्ती सापडली आहे.
 
 
Fhsan
 
घुमट अर्थात राजे लखुजीराव जाधव यांची सर्वात मोठी दगडी बांधकाम असलेली समाधी येथे सोळाशेच्या शतकात बांधली गेली. याच समाधी परिसरात सध्या केंद्रीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून उत्खनन सुरू आहे.
 
 
 
समाधी परिसराची दुरुस्ती व्हावी या दृष्टीने हे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, याच उत्खननात मागील महिन्यात शिवलिंग आढळून आले. त्यानंतर येथे सुरू असलेले उत्खनन अधिक गांभीर्याने केले जात आहे. या कामात शिवलिंग मिळालेला परिसर खोदण्यात आल्यानंतर संपूर्ण शिवमंदिराचा ढाचा येथे आढळला आहे. मातृतिर्थ सिंदखेड राजाचे मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे.
Powered By Sangraha 9.0