शिक्षार्थी सेविकांचे गोधनी भागात पथसंचलन

    दिनांक :21-Jun-2024
Total Views |
-ठिकठिकाणी स्वागत

नागपूर, 
Shikharthi Sevaks in Godhni : राष्ट्रसेविका समितीचा प्रवीण शिक्षा वर्ग नागपुरात सुरू असून त्यात सहभागी देशभरातील 84 सेविकांनी गोधनी परिसरात शिस्तबद्ध पथसंचलन केले. सेविकांच्या पथसंचलनाच्या स्वागतासाठी खुद्द पावसानेसुद्धा हजेरी लावली, हे विशेष. राष्ट्रसेविका समितीचा प्रवीण शिक्षा वर्ग गोधनीच्या भोसला मिलिट्री स्कूलमध्ये 8 जूनपासून सुरू आहे. देशभरातील 31 प्रांतातून 84 सेविका त्यात सहभागी झाल्या आहेत. या सेविकांनी आज सायंकाळी पथसंचलन केले.
 
 
Pathsanchalan
 
Shikharthi Sevaks in Godhni : गोधनीमधील पद्मावतीनगरातील राधाकृष्ण मंदिरापासून हे पथसंचलन सुरू झाले. त्यात सेविकांचे घोष पथक होते. दंड घेतलेल्या गणवेशातील सेविका घोषाच्या तालावर शिस्तबद्धतेने पावले टाकीत होत्या. संजीवनी रुग्णालय, बजरंग चौक, साई श्रद्धा नगर, मानकापूर पोलिस ठाणे, शिवनगर, धनराज हाईट्समार्गे शिवनगरातील शिवाजी पार्कमध्ये पथसंचलनाचा समारोप झाला. वाटेत ठिकठिकाणी पथसंचलनाचे नागरिकांनी स्वागत केले. राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, अ.भा. प्रमुख कार्यवाहिका अन्नदानम सीता गायत्री, वर्गाधिकारी पश्चिमी उत्तर प्रदेश क्षेत्र कार्यकारिणी सदस्या कमल धिंग्रा यांनी पथसंचलनाचे अवलोकन केले.