कृषी अधिकारी कर्मचार्‍यांनी 'या'साठी प्रयत्न करावे :अनिसा महाबळे

    दिनांक :22-Jun-2024
Total Views |
वाशीम, 
प्रत्येक शेतकरी Agriculture Officer खातेदार हा शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये समाविष्ट झाला पाहिजे. यासाठी कृषी विभागातील प्रत्येक अधिकारी कर्मचार्‍यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन आत्माच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे यांनी केले. बहुपीक पद्धतीचा अवलंब करून व जलपातळी वाढीच्या उपायोजना करण्यासाठी शेतकर्‍यांनी संघटित होऊन एकत्रित कामे केल्यास लवकरच सिंचन क्षेत्रामध्ये भरीव वाढ होईल तसेच शेतकर्‍याचे उत्पन्न वाढेल असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
 
 
erer
 
फलोत्पादन Agriculture Officer पिकावरील किड व रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप) सन २०२४-२५ अंतर्गत किड व रोग सर्वेक्षण चमुचे एकदिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणाच्या अध्यक्षस्थानावरून महाबळे बोलत होत्या. यावेळी प्रमुख मार्गदर्शक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरिफ शाह, कृषी विज्ञान केंद्र करडाचे विषय विशेषज्ञ निवृत्ती पाटील यांची उपस्थिती होती.तसेच कृषी उपसंचालक शांतीराम धनुडे, उपविभागीय कृषी अधिकारी अतुल जावळे,तंत्र अधिकारी प्रियंका कावरे, लक्ष्मण सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविकात तंत्र अधिकारी सावंत यांनी फलोत्पादन पिकावरील किड व रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप) अंतर्गत किड व रोग सर्वेक्षण या योजनेविषयी माहिती देऊन मार्गदर्शन केले. कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी रिसोड, मालेगाव, मंगरूळनाथ, मानोरा तसेच मंडळ कृषी अधिकारी ,कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन गोपाल मुठाळ यांनी केले तर आभार तालुका कृषी अधिकारी मानोरा उमेश राठोड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भागवत डोईफोडे, सुहास भगत, नितीन धवसे,गगन आडे व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.