स्विस,
Hinduja family स्विस न्यायालयाने ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक असलेल्या हिंदुजा कुटुंबातील चार सदस्यांना भारतातून आणलेल्या घरगुती मदतनीसांचे शोषण केल्याप्रकरणी दोषी ठरवले असून त्यांना चार ते साडेचार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. मात्र, न्यायालयाने मानवी तस्करीचे आरोप फेटाळून लावले आहेत. हे प्रकरण हिंदुजा कुटुंबाच्या लेक जिनिव्हा येथील बंगल्याशी संबंधित आहे. वृत्तानुसार, स्विस न्यायालयाने प्रकाश हिंदुजा आणि त्यांची पत्नी कमल हिंदुजा यांना 4.5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यांचा मुलगा अजय हिंदुजा आणि पत्नी नम्रता हिंदुजा यांना प्रत्येकी चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
या आदेशाविरोधात चार आरोपी उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, हिंदुजा कुटुंबातील सदस्य त्यांच्या घरगुती मदतनीसांचे शोषण आणि त्यांना अल्प आरोग्य लाभ देण्यास दोषी आहेत. Hinduja family हिंदुजा कुटुंब आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामासाठी जे पगार देत होते, ते स्वित्झर्लंडमधील अशा नोकऱ्यांच्या पगाराच्या एक दशांशपेक्षा कमी असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. मात्र, कामगारांना आपण कुठे जात आहोत आणि तिथे काय करायचे आहे, हे माहीत असल्याचे सांगत न्यायालयाने मानवी तस्करीचे आरोप फेटाळून लावले.
फिर्यादी पक्षाने ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत हिंदुजा कुटुंबावर त्यांच्या घरगुती मदतनीसांचे पासपोर्ट जप्त केल्याचा आरोप केला होता. एका कर्मचाऱ्याच्या पगारापेक्षा त्याने आपल्या कुत्र्यावर जास्त खर्च केल्याचा आरोपही करण्यात आला. शिवाय कर्मचाऱ्यांना स्विस फ्रँक्स ऐवजी रुपयात पगार दिला जात होता. Hinduja family हिंदुजा कुटुंबाने कथितरित्या त्यांच्या घरगुती मदतनीसांना बंगला सोडण्यास बंदी घातली आणि त्यांना बरेच तास काम करण्यास भाग पाडले. फिर्यादीने न्यायालयाला सांगितले होते की, हिंदुआ कुटुंबातील सदस्यांनी अनेक प्रसंगी कर्मचाऱ्यांना दिवसात 18 तास कमी किंवा कोणतीही रजा न देता काम करण्यास भाग पाडले होते.
हिंदुजा कुटुंबाने त्यांच्या घरगुती मदतनीसांना 18 तासांच्या कामासाठी भारतीय रुपयात फक्त 6.19 फ्रँक इतकेच वेतन दिल्याचा आरोप आहे. त्याच वेळी, कुटुंबाने त्यांच्या पाळीव कुत्र्यावर दरवर्षी 8554 फ्रँक खर्च केले. प्रकाश हिंदुजा आणि कमल हिंदुजा हे त्यांचे वय आणि प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत न्यायालयात प्रत्यक्ष हजर झाले नाहीत, तर न्यायालयाने अजय हिंदुजा आणि नम्रता हिंदुजा यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. Hinduja family भारतात मूळ असलेले हिंदुजा कुटुंब 1980 च्या उत्तरार्धात स्वित्झर्लंडमध्ये स्थायिक झाले. हिंदुजा समूहाचा आयटी, मीडिया, वीज, रिअल इस्टेट आणि आरोग्यसेवा यासारख्या क्षेत्रात व्यवसाय आहे. फोर्ब्सनुसार हिंदुजा कुटुंबाची एकूण संपत्ती सुमारे 20 अब्ज डॉलर्स आहे.