यवतमाळ जिल्हा पोलिस भरती दरम्यान जिल्हा पोलिस दलातर्फे स्तुत्य उपक्रम

22 Jun 2024 20:03:52
यवतमाळ, 
Yavatmal Police Recruitment : यवतमाळ जिल्हा पोलिस दलात पोलिस शिपाई संवर्गातील ४५ आणि चालक संवर्गातील २१ पदांची भरती प्रक्रिया बुधवार, १९ ते २६ जून दरम्यान नेहरू क्रीडा संकुलात होत आहे. यात चालक पदासाठी ५१९७ आणि शिपाई पदासाठी ३६९७ उमेदवार राहणार आहेत.
 
 
y22Jun-Police
 
पोलिस भरतीकरिता बाहेरगावावरून येणाèया उमेदवारांना शारीरिक चाचणीकरिता सकाळी वेळेत पोहोचता यावे, तसेच मुक्कामी असणाèयांची गैरसोय होऊ नये म्हणुन यवतमाळ जिल्हा पोलिस दलातर्फे गंगाकाशी मंगल कार्यालय, लोहारा मोफत निवास व्यवस्था करण्यात आली आहे. उमेदवारांना शारीरिक चाचणीकरिता सकाळी वेळेत पोचता यावे याकरिता वाहनाचीसुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे.
 
 
Yavatmal Police Recruitment : महिला उमेदवारांना काही अडचण आल्यास त्यांच्या मदत आणि संरक्षणाकरिता दोन महिला पोलिस तैनात आहेत. सर्वसाधारण, गरजू, गरीब उमेदवारांची गैरसोय होऊ नये व त्यांना व्यवस्थित पोलिस भरती परीक्षा देता यावी याकरिता जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. तसेच या उमेदवारांची सकाळच्या सत्रात पोलिस कवायत मैदान, पळसवाडी, यवतमाळ येथे जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. ही माहिती गरजू उमेदवारांपर्यंत पोचवावी, असे आवाहन जनसंपर्क अधिकारी शुभांगी गुल्हाने यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0