पद्मश्री हरिहरन यांचे शिष्य भाविक राठोड यांची यवतमाळात संगीत कार्यशाळा

    दिनांक :23-Jun-2024
Total Views |
यवतमाळ :
 
 
y23Jun-Bhavik-Rathod
 
सुप्रसिद्ध गझल गायक पद्मश्री हरिहरन यांचे पट्टशिष्य Bhavik Rathore भाविक राठोड यांची ‘रियाज कौशल्य’ ही संगीत कार्यशाळा यवतमाळात होत आहे. आरोही संगीत विद्यालय व संस्कार भारतीच्या वतीने सोमवार, 24 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता बाबाजी दाते महाविद्यालयाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात ही कार्यशाळा होत आहे. या नि:शुल्क कार्यशाळेत संगीत विषयात करिअर करू इच्छिणार्‍या व रुची असणार्‍या विद्यार्थी तथा रसिकांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन यवतमाळ संस्कार भारतीच्या अध्यक्ष डॉ. ललिता घोडे व मंत्री संजय सांबजवार यांनी केले आहे.