कुख्यात यश, लालीसह साथीदारावर मकोका

23 Jun 2024 20:09:16
- महानिरीक्षकांची मंजुरी : पोलिस अधीक्षकांची माहिती

यवतमाळ, 
विविध गुन्हे शिरावर असणार्‍या यश सुभेदार (वय 23, ग्रीनपार्क सोसायटी), श्रेयस राऊत (वय 23), शेख फारुख उर्फ लाली शेख अ‘तर (वय 27, भारतनगरी, भोसा), तेजस गायकवाड (वय 27, मंगेशनगर, भोसा) व एक अल्पवयीन मुलगा यांच्यावर ‘मकोका’ लावण्याचा प्रस्ताव महानिरीक्षकांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. त्याला मान्यता आल्याची माहिती पोलिस अधीक्षक Dr. Pawan Bansod डॉ. पवन बन्सोड यांनी रविवार, 23 जून रोजी पत्रपरिषदेत दिली.
 
 
y23Jun-Pavan-Bansod-(1)
 
पुढे बोलताना Dr. Pawan Bansod डॉ. बन्सोड म्हणाले, बाभुळगाव हद्दीत आकाश जतकर (26) हा हळदीचा कार्यक्रम आटोपून दुचाकीने पालोती येथे येत असताना. कोपरा बारड पुनर्वसन रस्त्याजवळून जाताना डबलसिट असलेल्या मोटरसायकल स्वाराने त्याची गाडी आडवी लावून त्यास अडविले. तो त्यांना चुकवून थोडा समोर गेला तेव्हा, दुसर्‍या एका पांढर्‍या अल्टो गाडीने पाठलाग करून त्याची मोटर सायकल अडवली. दुचाकीवरील दोन व अल्टोतील तीन व्यक्ती त्याच्या खिशातील पैसे जबरीने काढत असताना आकाश जतकर हा त्यांना विरोध करीत होता.
 
 
Dr. Pawan Bansod : ‘हमको पहचानता नहीं क्या, चल निकाल जल्दी, इसकी आतडी बाहर निकालना पडेगा, जादा शायना हो गया क्या’, अशी शिवीगाळ करून जबरदस्तीने त्याच्या खिशातले दोन ते अडीच हजार रुपये काढले. आकाशने त्यांना विरोध केला असता त्यापैकी एकाने आकाशला डाव्या कुशीत व कमरेत भोसकून व डाव्या डोळ्याजवळसुद्धा चाकू मारला. इतरांनी शिवीगाळ करीत त्याची अडवणूक केली तेव्हा आकाशने आरडाओरड केल्याने पेट्रोलपंपावरील मुले धावत आले. ते सर्व आरोपी अल्टो गाडी व त्यांचेकडील मोटर सायकलने तेथुन पळुन गेले. यासंदर्भात आकाश जतकर यांनी बाभुळगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
 
 
सहायक पोलिस निरीक्षक सूरज तेलगोटे यांनी आरोपी यश सुभेदार, श्रेयस राऊत, शेख फारुख उर्फ लाली शेख अख्तर, तेजस गायकवाड व एक अल्पवयीन बालक अशा 5 आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. हा संघटित गुन्हेगारीचाच प्रकार असल्याचे तपासात समोर आले. ठाणेदार तावरे यांनी अहवाल तयार करून विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे पाठवला. अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश बैसाने करीत आहेत.
Powered By Sangraha 9.0