- अमित शाह यांच्या हस्ते ‘एफटीआय-टीटीपी’चा प्रारंभ
नवी दिल्ली,
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी Fast Track Immigration Trusted Traveler Program ‘फास्ट ट्रॅक इमिग्रेशन ट्रस्टेड ट्रॅव्हलर प्रोग्रॅम’चा (एफटीआय-टीटीपी) शुभारंभ केला. याअंतर्गत भारतीय नागरिक आणि विदेशातील भारतीय नागरिक (ओसीआय) कार्ड धारकांसाठी इमिग्रेशन प्रक्रिया अधिक गतिमान केली जाणार आहे. याचा लाभ घेण्यासाठी पात्र व्यक्तींना ऑनलाईन अर्ज करावा लागेल. अर्जासोबत बायोमेट्रिक्स (बोटांचे ठसे) द्यावे लागतील.
Fast Track Immigration Trusted Traveler Program : एफटीआय नोंदणी जास्तीत जास्त 5 वर्षे किंवा पासपोर्टची वैधता यापैकी जे कमी असेल, तेवढी वर्षे वैध असेल. अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बायोमेट्रिक्स बंधनकारक असेल. अर्ज फेटाळला जाऊ नये यासाठी अर्जदारास आपला सध्याचा पत्ता द्यावा लागेल. एफटीआय-टीटीपीचा उद्देश लोकांचा प्रवास अधिक सोपा आणि सुरक्षित करणे हा आहे. मोबाईल ओटीपी आणि ईमेल पडताळणीनंतर नोंदणी पूर्ण होईल, एफटीआय-टीटीपी हा कार्यक‘म अमेरिकेच्या ‘ग्लोबल एंट्री प्रोग्राम’ सारखा आहे. देशातील 21 प्रमुख विमानतळांवर तो राबविला जाईल. पहिल्या टप्प्यात तो दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकता, बंगळुरू, कोची आणि अहमदाबाद या विमानतळावरून सुरू होणार आहे.