महिला व बाल रूग्णालयाचे वाढीव बांधकाम नियोजित वेळेत पुर्ण करा

25 Jun 2024 19:46:54
गडचिरोली, 
Women and Children Hospital  : गडचिरोली जिल्ह्यातील विद्यमान महिला व बाल रूग्णालयावर पडत असलेला आरोग्य सेवेचा अतिरिक्त भार लक्षात घेता नविन बांधकाम सुरू असलेल्या महिला व बाल रूग्णालयाचे वाढीव बांधकाम नियोजित वेळेत पुर्ण करा, अशा सूचना आमदार डॉ. देवराव होळी यांनी नवीन निर्माणाधीन बांधकामाची पाहणी करतांना अधिकार्‍यांना केल्या.
 
 
vadhiv
 
याप्रसंगी महीला रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. आखाडे, इंजिनिअर कोहळे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी आमदार होळी यांनी 100 बेडेड वाढीव रुग्णालयाच्या बांधकामासंदर्भात काय कारवाई झाली? त्यात काय तांत्रिक अडचणी आहेत? याबाबत उपस्थितांना विचारणाकेली. तसेच काही आवश्यक त्या सूचना उपस्थित अधिकार्‍यांना केल्या व नियोजित वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
 
 
हनुमान वार्डात रस्ता बांधकामाचे लोकार्पण
 
 
गडचिरोली शहरातील हनुमान वार्ड व तेली मोहल्यात 40 लक्ष रुपयांच्या रस्ता बांधकामाचे लोकार्पण आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते पार पडले. आपण विकास कामांसाठी या वार्डात मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिला असून लोकप्रतिनिधी नगरसेवकांनी मागितलेल्या सर्व कामांना आपण प्राधान्य दिल्याचे आमदारांनी यावेळी सांगितले.
 
 
याप्रसंगी भाजपा जेष्ठ नेते रमेश भुरसे, शहर अध्यक्ष मुक्तेश्‍वर काटवे, माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, शहर महामंत्री केशव निंबोड, माजी नगरसेविका निता उंदीरवाडे, देवाजी लाटकर, युमो उपाध्यक्ष प्रतीक राठी, अर्चना निंबोड, नरेश हजारे, शहर महामंत्री विवेक बैस, नीता बैस, रश्मी बागमारे, बालाजी भांडेकर, मनोहर भांडेकर, रमेश बोधलकर, शंकर भांडेकर, पद्माकर पिपरे, सुधाकर शेंडे, पुरुषोत्तम गुरनुले यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0