आंतरराष्ट्रीय धावपटू देव चौधरी देशाच्या नकाशावर दक्षिण आफ्रिका कॉम्रेडस मॅरेथॉनमध्ये देवचा विक्रम

    दिनांक :26-Jun-2024
Total Views |
यवतमाळ,
जीवनात वेगळेच लक्ष्य उराशी घेऊन जिल्ह्याचे नाव सातत्याने उंचावत आंतरराष्ट्रीय स्तरावर देव चौधरी भारताचा तिरंगा फडकवीत आहे. फारशा सुविधा उपलब्ध नसताना देव सध्या एकाग्रतेने सराव करत असून त्याची बुधवार, 26 जूनला यवतमाळात प्रसार माध्यमांशी भेट घालून देण्यात आली. दररोज 30 किलोमीटर आणि महिन्याला हजारो किलोमीटर धावून International runner Dev Chaudhary आंतरराष्ट्रीय धावपटू देव चौधरीने यवतमाळ जिल्ह्याच्या क्रीडा विश्वाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात आपले नाव कोरून जिल्ह्याची पताका जगात फडकवली आहे.
 
 
y26Jun-Dev-Chaudhari
 
पुसदमधील श्रीरामपूरच्या शेतकरी कुटुंबातील देव श्रीरंग चौधरी हा 27 वर्षांचा ध्येयवेडा मुलगा पोलिस भरतीसाठी मुलामुलींचा धावण्याचा सराव पाहून वयाच्या 18 व्या वर्षी धावायला लागला. कोणाचेही मार्गदर्शन नसताना एकलव्याप्रमाणे जिद्दीने रोज 20 ते 25 किलोमीटर नियमित धावणे त्याने सुरू केले. त्यासोबतच डोंगरमाळा, खाचखळगे, जंगलातून धावणारा देव अवघ्या नऊ वर्षार्ंत दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथील 90 किलोमीटर अंतराच्या कॉम्रेडस मॅरेथॉन स्पर्धेत 97 वर्षांच्या इतिहासात सर्वात वेगवान भारतीय धावपटू म्हणून ही स्पर्धा 7 तास 4 मिनिटात पूर्ण करून जागतिक नोंद केली.
 
 
 
International runner Dev Chaudhary : विदेशी भूमीवरील विविध मॅराथॉन स्पर्धांमध्ये देवने विजय पताका फडकवल्या आहेत. द अल्टीमेट हयुमन रेस, हेत्रूर बांबू अल्ट्रा, इंडियन बॅकयार्ड अल्ट्रा रेस या जागतिक स्पर्धांमध्ये त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. प्रशिक्षक म्हणून अनिल कोरवी त्याच्या पाठीशी आहेत. नियमित सरावाकरिता त्याला दरमहा 25 हजार रुपये किंमतीचा बूट लागतो. दक्षिण आफ्रिकेसाठी आमदार इंदनील नाईक, शरद मैंद, अजय मुंधडा, विजय पालतेवार, राजू निवल, सुशील कोठारी, राजेंद्र शेळके, वैभव फुके, किशोर गोपलानी यांनी मदत केल्यामुळेच त्याला जागतिक विक्रम करता आला. आता देव चौधरीचे यवतमाळ ते अयोध्या धावत जाणे व येणे हे स्वप्न आहे. प्राचार्य डॉ. जयंत चतुर, राजू जॉन, अविनाश लोखंडे, अनंत पांडे, जितेंद्र सातपुते, सचिन भेंडे, आनंद भुसारी, डॉ. संदीप चावक, जगदीश जांगीड यांची यावेळी उपस्थिती होती.