आनंदवन हादरले...युवतीची हत्या!

27 Jun 2024 19:37:27
तभा वृत्तसेवा
 
वरोडा, 
 
Anandvan-Chandrapur भरदिवसा घरी एकटी असताना गजबजलेल्या आनंदवनात युवतीची हत्या करण्यात आली. ही घटना बुधवार, 26 जून रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. आरती दिगंबर चंद्रवंशी असे मृतक युवतीचे नाव आहे. आनंदवनात दिगंबर चंद्रवंशी हे मागील अनेक वर्षांपासून पत्नी आणि मुलीसह वास्तव्य करीत आहेत. Anandvan-Chandrapur दिगंबर आणि त्यांची पत्नी दिव्यांग असून, त्यांची 24 वर्षीय मुलगी आरती ही बुधवारी घरी एकटीच होती. तर तिचे आई-वडिल कामानिमित्त सेवाग्राम येथे गेले होते. Anandvan-Chandrapur सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास दिगंबरने आरतीला अनेकदा फोन केले असता, तिचा भ्रमणध्वनी बंद येत होता.
 
 
 
Anandvan-Chandrapur
 
 
त्यानंतर सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास पती-पत्नी घरी आले असता, आरती स्नानगृहामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडली दिसली. त्यांनी आरडाओरड केली. याची माहिती लगेच वरोडा पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी गाठून पंचनामा केला. Anandvan-Chandrapur पोलिस घटनास्थळी गेले असता, त्यांना आरतीच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केल्याची बाब निदर्शनास आली. मात्र, घटनास्थळी शस्त्र आढळून आले नाही. आनंदवनात दिवसभर रेलचेल असते तरीसुद्धा भर दिवसा युवतीची हत्या झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद जांभुळे यांना विचारले असता ते म्हणाले, ही घटना दुपारच्या सुमारास घडली असावी.Anandvan-Chandrapur
 
 
 
आरोपीने शस्त्र आणि मृतक युवतीचा भ्रमणध्वनीसुद्धा सोबत नेला. आनंदवनातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून, श्वानपथक आणि ठसे तज्ञांना पाचारण केल्याचे त्यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम, पोलीस निरीक्षक अमोल काचोरे आदींनी घटनास्थळी भेट दिली. चंद्रपूर गुन्हे शाखेच्या पथकाला पाचारण करून तातडीने तपास सुरू केला. Anandvan-Chandrapur मात्र, वृत्त लिहिपर्यंत कुणालाही अटक करण्यात आली नव्हती.
 
 
Powered By Sangraha 9.0