जेवन बनविण्यावरून सहकार्‍याची हत्या

28 Jun 2024 19:56:41
गोंदिया, 
gondia murder  कामावर असलेल्या दोन सहकार्‍यांत जेवन बनविण्यावरून वाद झाला. वाद विकोपाला जात एकाने दुसर्‍याच्या डोक्यात टिकास मारून हत्या केल्याचा प्रकार आमगाव तालुक्यातील अंजोरा येथे 26 जूनच्या रात्री 9 च्या सुमारास उघडकीस आला. शेरसिंग मंगलसिंग उईके (40) असे मृताचे नाव आहे.
 
 
gondia murder
 
बगाटोला, मध्यप्रदेश येथील मृतक मजूर शेरसिंग उईके आरोपी बादल उर्फ रामचरण रामप्रसाद उईके हे गिरधर ट्रेडिंग कंपनी लांजीच्या अंजारो येथील बांबू डेपोमध्ये बांबू तोडण्याचे काम करत होते. gondia murder बांबू डेपोतच झोपडी करून ते राहत होते. दरम्यान, 26 जूनच्या रात्री शेरसिंग व बादल यांच्यात जेवण बनवण्याच्या कारणावरून वाद झाला, वाद विकोपाला जात बादलने शेरसिंगच्या छाती व डोक्यावर टिकासीने वार केले यातच तो जागीच गतप्राण झाला. घटनेची माहिती आमगाव पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून आरोपीला ताब्यात घेवून गुन्हा नोंद केले. न्याचालयाने आरोपीला पोलिस कोठडी ठोठावली आहे.
Powered By Sangraha 9.0