आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी

    दिनांक :28-Jun-2024
Total Views |
नागपुर 
Shahu Maharaj वंचित बहुजन आघाडी शहर तर्फे सीताबर्डी कार्यालयात आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष ओबीसी समाजाचे प्रबोधनकार  विनोद कोलीपवार हे होते.यांच्या हस्ते छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची प्रतिमेला हार अर्पण व अभिवादन करण्यात आले. त्या नंतर वंचित बहुजन महिला आघाड़ीची उपाध्यक्षा नलिनी खांडेकर, नागपुर शहर महासचिव धर्मेश फुसाटे,राहुल दहिकर यानी  आपले मनोगत व्यक्त केले.
s1 
 
 या प्रसंगी, नागपुर शहर अध्यक्ष रवि भाऊ शेंडे, महासचिव राहुल दहिकर, धर्मेश पूजटे, प्रा रूपेंद्र खांडेकर, सौ नलिनी खांडेकर, वंदना पेटकर, रीता जामगड़े,Shahu Maharaj शिशुपाल देशभर्तर, इरफान पठान, अंकुश मोहिले, रोहित गोघड़े, संगपाल गाडेकर, राजेश रामटेके, अतुल गजभिए, राहुल भीमटे , संदेश भाऊ, विजय गोंडुले, सिद्धार्थ भांगे, अरविंद मेश्राम, किशोर धोटे,आदि मान्यवर उपस्थित होते.
सौजन्य: अशोक माटे,संपर्क मित्र