धोनीचा नवा लूक इंटरनेटवर व्हायरल!

28 Jun 2024 16:16:22
नवी दिल्ली, 
Dhoni's new look T20 विश्वचषक 2024 मध्ये भारतीय संघाने इंग्लंडचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारतीय क्रिकेट चाहते संघाच्या या विजयाने खूप आनंदी आहेत आणि भारतीय संघ अंतिम फेरीत आपली विजयी मोहीम सुरू ठेवण्यासाठी आणि T20 विश्वचषक विजेतेपदाची वाट पाहत आहेत. सोशल मीडियावर क्रिकेट चाहते भारताच्या विजयासाठी आणि अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा देत आहेत. दरम्यान, भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने इंटरनेटवर नवा लूक आला आहे.   हेही वाचा : टीम इंडियाचे बार्बाडोसमध्ये आगमन!
  
  
vdbgdtd
महेंद्रसिंग धोनी सुरुवातीपासूनच त्याच्या हेअरस्टाइलसाठी ओळखला जातो. यावेळी देखील कॅप्टन कूलने आपल्या नवीन हेअरस्टाइलने लोकांची मने जिंकली आहेत. धोनीचा हा नवा लूक काही तासांतच सोशल मीडियावर लोकप्रिय झाला. या लूकमध्ये कॅप्टन कूल खूपच गोड आणि आकर्षक दिसत आहे. Dhoni's new look धोनीचे चाहतेही त्याचे हे छायाचित्र त्यांच्या अकाऊंटवर शेअर करत आहेत.  बॉलिवूड सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट आलिम हकीमने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून महेंद्रसिंग धोनीचे 4 फोटो शेअर केले आहेत. त्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, "आमचा तरुण, डायनॅमिक आणि देखणा महेंद्रसिंग धोनी.  हेही वाचा : नीट पेपर लेक प्रकरणाचा मुद्दा काढताच...संसदेत फुलो देवी झाल्या बेशुद्ध ?
Powered By Sangraha 9.0