ऋषभ पंतला मिळाले सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचे पदक, VIDEO

28 Jun 2024 14:26:59
नवी दिल्ली,   
Best Fielder Medal टी20 विश्वचषक 2024 च्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताने इंग्लंडचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. सामन्यादरम्यान उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केल्याबद्दल ऋषभ पंतला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक पदक देण्यात आले. भारतीय संघाचा माजी यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने ऋषभ पंतला हे पदक प्रदान केले.
 
 
Best Fielder Medal
 
इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत पंतने अक्षरच्या चेंडूवर जोस बटलरला झेलबाद केले होते. यानंतर अक्षरच्या गोलंदाजीदरम्यान मोईन अली त्याच्या चपळाईमुळे यष्टीचीत झाला. पॉवर प्लेमध्ये दोघेही बाद झाल्यावर इंग्लंडवर दबाव वाढला जो शेवटच्या विकेटपर्यंत कायम राहिला. पंतला पदक देण्यासाठी एका विशेष पाहुण्याला बोलावण्यात आले होते आणि तो दुसरा कोणी नसून भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक होता. Best Fielder Medal टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचलेल्या कार्तिकने सर्वात आधी एक स्पेशल स्पीच दिले, जे 2022 मध्ये टीम इंडियाच्या पराभवाशी संबंधित होते. यानंतर त्याने भारतीय संघातील खेळाडूंचे कौतुक केले.
 
जुना मित्र आणि कर्णधार रोहित व्यतिरिक्त त्याने राहुल द्रविडचे कौतुक केले. टीम इंडियाचे सर्व खेळाडू कार्तिकच्या आगमनाने कमालीचे उत्साहित दिसत होते. यावेळी सर्वांनी टाळ्या वाजवल्या आणि हे दृश्य पाहण्यासारखे होते. कार्तिकने पंतला पदक प्रदान केले. 2022 च्या टी-20 वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये भारताला इंग्लंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी भारतीय संघात दिनेश कार्तिकचाही समावेश होता. टीम इंडियाने यावेळी उपांत्य फेरीत त्या पराभवाचा बदला घेतला.
Powered By Sangraha 9.0