पालकमंत्री संजय राठोड यांचा वाढदिवस

    दिनांक :30-Jun-2024
Total Views |
- विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा
- महिलांना शिलाई मशीन, फवारणी किट, फेरीवाल्यांना हातगाडी भेट

यवतमाळ, 
Guardian Minister Sanjay Rathore : राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ, वाशीमचे पालकमंत्री संजय राठोड यांचा वाढदिवस रविवारी विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह नागरिकांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच गर्दी केली. शिवसेनेने यवतमाळसह दिग्रस, दारव्हा, नेर व जिल्ह्यात सर्वत्र विविध सामाजिक उपक्रम राबविले. यवतमाळ येथील अभीष्टचिंतन सोहळ्यात महिलांना शिलाई मशीन आणि गरीब व गरजू फेरीवाल्यांना हातगाडी वाटप अशा सामाजिक उपक्रमांसह शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. संजय राठोड यांचे समर्थक गिरीश व्यास यांच्या पुढाकारातून पाच गरजूंना व्यवसायासाठी हातगाड्या देण्यात आल्या.
 
 
y30Jun-Upakram
 
यावेळी आरती गुल्हाने, उषा अवथरे, मनोहर जांभुळकर, संगीता वासनिक आणि राजू गोलाईत यांना संजय राठोड यांच्या हस्ते हातगाडी भेट देण्यात आली. या अनोख्या भेटीने या फेरीवाल्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. याप्रसंगी शिवसेना यवतमाळ तालुकाप्रमुख योगेश वर्मा यांच्या पुढाकारात 11 गरजवंत महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. या महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी शिलाई मशिन देण्यात आल्या. शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख हरिहर लिंगनवार व जिल्हाप्रमुख श्रीधर मोहोड यांच्या पुढाकारात 100 शेतकर्‍यांना फवारणी किटचे वाटप संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी शिवसेना सदस्य नोंदणीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी नवीन सदस्यांना संजय राठोड, युवासेना राज्य कार्यकारणी सदस्य अ‍ॅड. दामिनी राठोड, हरिहर लिंगनवार, श्रीधर मोहोड व विशाल गणात्रा यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
 
दोन क्विंटलचा हार, 50 किलोंचा केक
Guardian Minister Sanjay Rathore पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवशी कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या. सोलापूरचे समर्थक संदीप राठोड, युवराज चव्हाण यांनी तब्बल दोन क्विंटल वजनाचा पुष्पहार व 50 किलोंचा केक आणला. हा पुष्पहार संजय राठोड व शीतल राठोड यांच्या गळ्यात घालण्यासाठी चक्क क्रेनचा वापर करावा लागला. अनेक समर्थकांनी ढोल-ताशे, हलगीपथक, आदिवासी नृत्य अशा विविध पद्धतीने शुभेच्छा दिल्या.
विविध मान्यवरांकडून शुभेच्छा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मान्यवर व आमदारांनी विविध माध्यमांतून संजय राठोड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख हरिहर लिंगनवार, महिला आघाडी संपर्कप्रमुख कालिंदा पवार, जिल्हाप्रमुख श्रीधर मोहोड, महिला आघाडी जिल्हाप्रमुख वैशाली मासाळ, पराग पिंगळे, बाळासाहेब दौलतकर या मान्यवरांसह पोहरादेवी येथील महंत, यवतमाळ व वाशिम जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटना पदाधिकार्‍यांसह हजारो नागरिकांनी संजय राठोड यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती.