ब्रिजटाऊन,
T20 world cup विराट कोहलीची ७६ धावांची झुंझार खेळी, तसेच हार्दिक पांड्याने अखेरच्या षटकांत केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर भारताने संघर्षपूर्ण अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ७ धावांनी रोमहर्षक विजय नोंदविला आणि आयसीसी टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. १७ वर्षांनंतर भारताने दुसन्यांदा टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरले. विराट कोहली सामनावीर, तर जसप्रीत बुमराह स्पर्धावीर पुरस्काराचे मानकरी ठरले. भारताने मर्यादित २० षटकांत ७ बाद १७६ धावा काढल्या आणि दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी १७७ धावांचे लक्ष्य ठेवले, परंतु दक्षिण आफ्रिकेला
२० षटकांत ८ बाद १६९ धावांपर्यंतच मजल मारता आली.
कर्णधार रोहित शमनि नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णप घेतला आणि विराट कोहलीच्या साथीने भारताच्या डावाला सुरुवात केली. परंतु रोहित (९) तिसऱ्याच षटकांत डावखुरा केशव महाराजच्या फिरकीला बळी पडला. त्याने कोहलीसोबत २३ धावांची सलामी भागीदारी केली. पुढे विराट जket 4 कोहली एक बाजू सांभाळ होता, परंतु त्याला साथ देण्यास आलेले ऋषभ पंत (०) व सूर्यकुमार यादव (३) अनुक्रमे केशव महाराज व कॅगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर बाद झालेत. त्यामुळे भारताची ४.३ षटकांत ३ बाद ३४ अशी दयनीय स्थिती झाली होती.
विजयासाठी १७७ धावांचा पाठलाग करताना
मात्र ऐन मोक्याच्या क्षणी कोहलीची बॅट तळपली व त्याला अक्षर पटेलची उत्तम साथ मिळाली. या दोघांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. त्यांनी चौथ्या गड्यासाठी ७२ धावांची भागीदारी करत संघाला १०६ धावांचा टप्पा गाठून दिला. याचवेळी एक चोरटी धाव काढण्याच्या प्रयत्नात अक्षर धावबाद झाला. अक्षर पटेलने ३१ चेंडूंत १ चौकार व ४ षट्कारांच्या मदतीने महत्त्वपूर्ण ४७ धावांची खेळी केली. पुढे कोहलीने शिवम दुबेशी चांगला समन्वय साधत पाचव्या गड्यासाठी ५७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली व संघाला १६३ धावांवर पोहोचवले. मार्को जॅनसेनच्या चेंडूवर रबाडाकडून झेलबाद होण्यापूर्वी कोहलीने ५९ चेंडूंत ७६ धावांची मोठी खेळी केली, यात त्याने ६ चौकार व २ षट्कार खेचलेत. पुढे शिवम दुबे नॉर्टिजच्या गोलदाजीवर बाद झाला. शिवम दुबेने १६ चेंडूंत झटपट २७ धावा काढल्या, यात त्याने ३ चौकार व एक षट्कार हाणला. हार्दिक पांड्या (नाबाद ५) व रवींद्र जडेजाने भारताला मर्यादित २० षटकांत ७ बाद १७६ धावा
दक्षिण आफ्रिकेला प्रारंभीच दोन जबरदस्त हादरे बसले. जसप्रीत बुमराहने सलामीवीर रेझा हेन्ड्रिक्सला (४), तर अर्शदीप सिंगने कर्णधार एडन मार्करामला (४) बाद केले. दक्षिण आफ्रिकेने २.३ षटकांत १२ धावांत दोन महत्त्वपूर्ण मोहरे गमावले, परंतु त्यानंतर क्विंटन डी कॉक व ट्रिस्टन स्टब्सने तडाखेबंद फलंदाजी करत संघाचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी ५८ धावांची भागीदारी केली. स्टब्सने २१ चेंडूंत ३ चौकार व एका षट्कारसह ३१ धावांची खळी केली. पुढे डी कॉकने हेनरिक क्लासेनसोबत चौथ्या गड्यासाठी ३६ धावांची भागीदारी करत दक्षिण आफ्रिकेला १०६ धावांचा टप्पा गाठून दिला. डी कॉकने ३१ चेडूंत ४ चौकार व एका षट्कारसह ३९ धावांची खेळी केली. पुढे क्लासेन व डेव्हिड मिलरने पाचव्या गड्यासाठी ४५ धावांची भागीदारी केली व संघाला १५१ धावांवर पोहोचवून सामन्यात आपले आव्हान कायम रोखली. T20 world cupक्लासेनने अवघ्या २७ चेंडूंत २ चौकार व ५ षट्कारांच्या मदतीने ५२ धावांची आकर्षक खेळी केली. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेला उर्वरित २३ चेंडूंत २० धावा काढण्याची गरज होती व डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कॅगिसो रबाडा, अॅनरिक नॉर्टिज यांच्यावर होती, परंतु जॅनसेन दोन धावा काढून बुमराहच्या चेंडूवर बाद झाला. मात्र अखेरच्या षटकांत हार्दिक पांड्याने कमाल केली व सामन्याचा कल भारताच्या बाजूने झुकविला. पांड्याच्या चेंडूवर डेव्हिड मिलरचा उडालेला झेल सीमारेषेजवळ सूर्यकुमार यादवने सुरेख पकडला. मिलर (१७ चेंडूंत २१ धावा) बाद होताच विजय भारताच्या आवाक्यात आला, तेव्हा दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी उर्वरित पाच चेंडूंत १६ धावा काढण्याची गरज होती, परंतु अशातच हार्दिकने कॅगिसो रबाडाला (४) बाद केले. केशव महाराज (२) व अॅनरिक नॉर्टिजने (१) नाबाद खेळी करत मर्यादित २० षटकांत संघाला ८ बाद १६९ धावांपर्यंतच मजल मारून देता आली. याबरोबरच भारताने ७ धावांनी रोमहर्षक विजय नोंदवून टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरले. भारताकडून हार्दिक पांड्याने २० धावांत ३ बळी, अर्शदीप सिंग व जसप्रीत बुमराहने प्रत्येकी २ बळी, तर अक्षर पटेलने एक बळी टिपला. (वृत्तसंस्था
हा माझा अखेरचा टी-२० विश्वचषक : कोहली
सामनावीर पुरस्कार स्वीकारताना विराट कोहली म्हणाला, हा माझा अखेरचा टी-२० विश्वचषक होता. टी-२० विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न साकार झाले आहे. एखाद्या दिवशी तुम्हाला धावा काढताना झगडता. तुम्ही धावा घेऊ शकत नसल्याचे जाणवते. मग गोष्टी घडतात, बदलतात. देव महान आहे. ज्या दिवशी संघाला - सर्वात जास्त गरज असते, त्यादिवशी संघासाठी माझ्या बॅटमधून धावा निघाल्या. हा माझा अखेरचा टी-२० सामना आहे.T20 world cup अखेरच्या सामन्यात मला जास्त फायदा घ्यायचा होता. विश्वचषक उंचवायचा होता. आता पुढच्या पिढीने जबाबदारी स्वीकारण्याची वेळ आली आहे, काही अप्रतिम खेळाडू संघाला पुढे नेतील आणि भारताचा झेंडा फडकवत ठेवतील, असे विराट कोहली म्हणाला.