इस्रायलचे गाझापट्टीत हल्ले, 40 पॅलेस्टिनींचा मृत्यू

    दिनांक :30-Jun-2024
Total Views |
- आतापर्यंत 37,834 नागरिकांनी गमावला जीव
 
जेरुसलेम, 
गाझापट्टीत इस्रायलने शनिवारी रात्री अनेक हल्ले केले यात 40 पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले, तर 225 जण जखमी झाले आहेत. गाझामधील आरोग्य अधिकार्‍यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये Palestinian-Israeli war पॅलेस्टिनी-इस्रायल संघर्ष सुरू झाल्यापासून 37,834 नागरिकांनी जीव गमावला, तर 86,858 लोक जखमी झाले आहेत.
 
 
Palestinian-Israeli war
 
Palestinian-Israeli war : इस्रायली लष्कराचे प्रवक्ते अविचाय अद्राई यांनी एका निवेदनात सांगितले की, इस्रायली सैन्याने शुजैया भागातील दहशतवादी लक्ष्यांवर हल्ले करणे सुरूच ठेवले आहे. गेल्या काही तासांत झालेल्या चकमकींमध्ये लष्कराने अनेकांना ठार केले. दरम्यान इस्त्रायली सैन्याला या भागातील शाळेच्या आवारात शस्त्रसाठा सापडल्याचे त्यांनी सांगितले. राफाहमध्ये इस्रायली सैन्याने अनेक दहशतवाद्यांना ठार केले आणि बोगद्यासह अनेक दहशतवादी पायाभूत सुविधाही नष्ट केल्या आहेत. सैनिकांना गाझा भागातील शाळेच्या संकुलात शस्त्रास्त्रांचा साठा सापडला आहे.