-नितीन गडकरी घेणार रेणुका मातेचे दर्शन
नागपूर,
झिल्पी मोहगाव येथील Shri Renuka Mata Temple today श्री रेणुका माता देवस्थानचा जीर्णोद्धार भूमिपूजन सोहळा उद्या सोमवारी 1 जुलैला आयोजित करण्यात आलेला आहे. सोमवारी सकाळी 8 वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी श्री रेणुका मातेचे दर्शन घेतील. सकाळी 11 वाजता सुप्रसिद्ध उद्योजक अरुणजी लखानी यांच्या हस्ते श्री रेणुका माता मंदिराचे जीर्णोद्धार भूमिपूजन होईल. कार्यक‘माचे अध्यक्षस्थान भारतीय जनता पार्टीचे विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर हे भूषवितील. श्री रेणुका देवी संस्थान माहूर येथील मु‘य पुजारी व विश्वस्त चंद्रकांत भोपी यांची प्रमुख उपस्थिती असेल. विशेष अतिथी म्हणून झिल्पी मोहगावचे सरपंच प्रमोद डाखले उपस्थित राहतील.
सोमवारी होणार्या Shri Renuka Mata Temple today श्री रेणुका माता मंदिराच्या जीर्णोद्धार भूमिपूजन कार्यक‘मात सर्व भाविक नागरिकांनी आवर्जून सहभागी व्हावे, असे आवाहन श्री रेणुका माता देवस्थानचे अध्यक्ष संदीप जोशी यांच्यासह उपाध्यक्ष आर्किटेक्ट प्रशांत सातपुते, सचिव पराग सराफ, सहसचिव अॅड. परेश जोशी, कोषाध्यक्ष अनिरूद्ध भगत, विश्वस्त सर्वश्री आनंद महाजन, डॉ. पीयूष आंबुलकर, विनोद कन्हेरे, विश्वस्त सुवर्णा पडोळे यांनी केले आहे.