-302 ऐवजी 103, 392 ऐवजी 309
नागपूर,
new laws : आजपासून नागपूरसह संपूर्ण भारतात खून व हत्येप्रकरणी कलम 302 ऐवजी 103, दरोडा पडल्यास 392 ऐवजी 309 ची नोंद होणार आहे. एकंदरितच भारतीय दंड विधान इतिहासजमा होईल. भारतातील प्रमुख तीन फौजदारी कायद्यांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. उद्या 1 जुलैपासून ते अमलात येतील. भारतीय दंड संहिता 1860 ऐवजी भारतीय न्याय संहिता 2023, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 ऐवजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 व भारतीय पुरावा कायदा 1872 ऐवजी भारतीय साक्ष अधिनियम 2023 याप्रमाणे कायद्यांंच्या नावात बदल झाला आहे.
कायद्यात वेळोवेळी बदल व दुरुस्त्या झाल्या असल्या, तरी गेल्या वर्षी केंद्र सरकारने त्यात मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला. इंग्रज काळातील फौजदारी कायदे आता 3 नवीन कायद्यांद्वारे बदलले जाणार आहेत. त्यासाठी प्रशासनाने युद्ध पातळीवर प्रशिक्षण दिले आहे. सर्वसामान्य नागरिकांना हेही माहीत आहे की, खून झाल्यास भारतीय दंड संहितेच्या कलम 302 नुसार गुन्हा दाखल केला जातो, परंतु आता नवीन कायद्यांनुसार भारतीय दंड संहितेतील कलमे बदलणार आहेत.
खुनाच्या बाबतीत, आता भारतीय दंड संहितेच्या कलम 302 नुसार नव्हे तर भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम 103 अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल. सामान्य भाषेत, नागरिकांचे म्हणणे आहे की, जेव्हा दरोड्याची घटना घडली तेव्हा ती ‘ब्याण्णव’ झाली. पण, आता बीएनएसमध्ये ते कलम 309 असेल. 3 नवीन फौजदारी कायदे - भारतीय न्यायिक संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा कायदा 25 डिसेंबर 2023 रोजी केंद्र सरकारने अधिसूचित केले.
new laws : भारतीय दंड संहिता आता भारतीय न्यायिक संहिता असेल. फौजदारी प्रकि‘या संहिता आता भारतीय नागरी संरक्षण संहिता असेल. आयपीसीमध्ये एकूण 23 कलमे व 511 कलमे होती. पण, बीएनएसमध्ये एकूण 20 कलमे व 385 कलमे आहेत. नव्या कायद्यात 12 नवीन कलमांचाही समावेश करण्यात आला आहे. याशिवाय 30 कलमांमध्ये शिक्षेतही वाढ करण्यात आली आहे. कायद्यांमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत व दस्तऐवजांची व्या‘या लक्षणीयरित्या विस्तारली आहे. या नव्या कायद्यांचे प्रशिक्षण पोलिस, न्यायाधीश, वकील, विद्यार्थी आणि आधिकारी- कर्मचार्यांना दिले गेले. नागरिकांना नवीन कायद्यांची माहिती देण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे.
काही दिवस जड जाणार
नवे बदल पूर्णपणे माहिती करून घेण्यास जड जात आहे. याचे कारण, कायद्याचे शिक्षण जुन्या कायद्यानुसार झाले आहे. नवे बदल आत्मसात करून अमलबजावणीत प्रत्येकालाच वेळ लागणार आहे. पण, सध्या वकिलांसह सर्वांनीच एक तक्ता तयार करून घेतला आहे. जुने व नवे कलम त्यात आहेत. तो सदोदित जवळ बाळगावा लागणार आहे. बहुतांशी वकिलांनी हीच तयारी केली आहे.
-अॅड. मदन सेनाड
गुन्ह्याचा प्रकार आयपीसी बीएनएस
छेडखानी 354 74
फसवणूक 420 318 (4)
हुंडा बळी 304 (ब) 80
खून-हत्या 302 103
खुनाचा प्रयत्न 307 109
दरोडा 395 310
विना उद्देश खून 304 105
दुष्कर्म 376 64
चोरी 379 303
वाटमारी 380 305 (अ)
सरकारी कामात अडथळा 353 132