समर्पणयागाची सुरुवात!

Exit Poll-Narendra Modi प्रतिमाहनन मोहिमा निष्प्रभ

    दिनांक :04-Jun-2024
Total Views |
अग्रलेख
Exit Poll-Narendra Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा हीच त्यांच्या लोकप्रियतेची ताकद असल्यामुळे ती उद्ध्वस्त करून त्यांचे अधिकाधिक प्रतिमाहनन करणे हाच आपला आगामी कार्यक्रम राहील, असे पाच वर्षांपूर्वी, २०१९ मधील मे महिन्यातच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जाहीर केले होते. Exit Poll-Narendra Modi त्यानंतरच्या गेल्या पाच वर्षांपासून हाच कार्यक्रम प्रतिज्ञापूर्वक राबविणाऱ्या काँग्रेसची ही भूमिका पटल्यामुळे महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे, शरद पवार आदी नेत्यांसह विविध राज्यांतील नेत्यांनी एकत्र येऊन सामूहिकपणे सुरू केलेला पंतप्रधानांच्या प्रतिमाहननाचा कार्यक्रम देशातील जनतेस मानवलेला नाही, हे २ जूनच्या एक्झिट पोलद्वारे विविध माध्यमांनी वर्तविलेल्या अंदाजाने दाखवून दिले.Exit Poll-Narendra Modi याच कटाचा एक भाग म्हणून विरोधकांसाठी काम करणाऱ्या टोळीने जन्माला घातलेले ‘टुलकिट' नावाचे एक हत्यारही भाजपाच्या दक्षतेमुळे उघडकीस येऊन निष्प्रभ करण्यात आले होते. Exit Poll-Narendra Modi ‘चौकीदार चोर है' हा आपला आवडता जुमला जनतेच्या आणि न्यायालयाच्या तोंडी घालून वापरल्याप्रकरणी राहुल गांधी यांना न्यायालयासमोर सपशेल बिनशर्त माफी मागावी लागली होती, तरीही या आघाडीच्या तंबूतून सुरू असलेले मोदी यांच्या चारित्र्यहननाचे अनेक प्रयत्न देशाने प्रत्यक्ष अनुभवले.
 
 
 
 
Exit Poll-Narendra Modi
 
 
 
 
Exit Poll-Narendra Modi अशाच एका उन्मादाच्या क्षणी तर राहुल गांधी यांना विजयाचा साक्षात्कार झाला होता. आम्ही मोदी यांना उद्ध्वस्त करून टाकले असून त्यांना पराभव दिसू लागला आहे, अशी दर्पोक्ती त्यांनी त्या निवडणूक काळात निकालाच्या जेमतेम १० दिवस अगोदर केली होती, तर मोदी यांना पूर्ण बहुमत मिळणार नाही, असे काँग्रेसचे कमलनाथ यांनी जाहीर करून टाकले होते. त्यानंतरच्या पुढच्या जेमतेम १० दिवसांत काय झाले, हे देशाने पाहिले, तरी विरोधकांच्या डोळ्यांवरील झापडे उतरली नाहीतच; उलट दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्येच पडझडीचे वातावरण तयार झाले. Exit Poll-Narendra Modiपक्षांतर्गत नाराजी उफाळून आली, नेतृत्वबदलाची कुजबुज गोंगाटाएवढी वाढली, तर खुद्द राहुल गांधींनी पक्षाध्यक्षपदावरून पायउतार होण्याची तयारी केली. पराभवाचे खापर कोणावर फोडायचे याकरिता पक्षांतर्गत गटातटांची मोर्चेबांधणी सुरू झाली. राहुल गांधी यांनी तर काँग्रेसी नेत्यांच्या हट्टी भूमिकेलाच पराभवाचे कारण ठरवून टाकले. आपल्या मुलाबाळांचे राजकीय भवितव्य निश्चित करण्यासाठी नेत्यांनी घेतलेल्या हट्टी भूमिकेमुळेच काँग्रेसचा पराभव झाला, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट करून टाकले, तर नेत्यांनी राहुल गांधींना साथ दिली नाही, अशी खंत प्रियांका गांधींनी बोलून दाखविली. पराजयाचे शल्य पचविणे सोपे नसते.
 
 
 
 
 
Exit Poll-Narendra Modi मोदी यांचे प्रतिमाभंजन हे एकमात्र लक्ष्य ठरवून त्यांना नामोहरम करण्याचे विरोधकांचे राजकारण देशातील जनतेस मानवेल की नाही, याची कसोटी या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने लागणार होती. त्याचे उत्तर आता मिळणारच आहे. मात्र, हा अंदाजही पुरता फसला असून अरुणाचलसारख्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीतील निकालांनी अमृतकाळाच्या नव्या यशाची पायाभरणी केल्याचे स्पष्ट झाल्याने पंतप्रधान मोदी यांच्या स्वप्नातील नवभारताच्या निर्मितीची सुरुवात तर निश्चितच चांगली झाली आहे. १८ व्या लोकसभेसाठी झालेल्या मतदानाचे निकाल हाती येऊन देशाच्या नव्या वाटचालीच्या शुभारंभाचे पहिले पाऊल आता दूर नाही, याचे स्पष्ट संकेत अगोदरच मिळाले असल्याने, प्रतिमाहननाच्या हीन राजकारणातून सत्तेच्या सोपानाची वाटचाल करण्याचे काँग्रेसादी विघ्नसंतोषी पक्षांचे इरादे धुळीस मिळणार, हेही आता स्पष्ट झाले आहे. Exit Poll-Narendra Modi काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांच्या निवासस्थानी झालेल्या इंडिया आघाडीच्या नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, हे स्पष्टपणे उघड झालेले नसले, तरी बैठकीनंतर माध्यमांना सामोरे जाण्यासाठी नेत्यांनी लावलेल्या रांगेत राहुल गांधी यांना मागची जागा दिली गेली, तेव्हाच त्यांना आपल्या भवितव्याची चाहूल लागल्याचे संकेत स्पष्ट झाले होते.
 
 
 
 
तसे नसते, विजयाची चिन्हे अगोदरच उमगली असती, तर खडगे यांच्या जागी राहुल गांधी यांना माध्यमांसमोर उभे करून अन्य नेत्यांनी त्यांची सामूहिक आरती ओवाळली असती. पण तसे न होता, चेहऱ्यावरील निराश रेषा जरादेखील लपविल्या जाणार नाहीत, याचीच दक्षता घेत खडगे यांनी २९५ जागांच्या अंदाजाचा पुकारा केला, तेव्हा केजरीवालादी नेत्यांचा चेहरा बराचसा बोलका होऊन त्यांना खोकल्याची लहानशी उबळदेखील आली, हे त्या पत्रकार परिषदेच्या साक्षीदारांतील अनेक चाणाक्षांच्या नजरेतून निश्चितच निसटले नसेल. Exit Poll-Narendra Modi पुढच्या दोन दिवसांतील इंडिया आघाडीच्या तंबूतील शांततादेखील पुरेशी बोलकी ठरली आणि आजच्या प्रत्यक्ष निकालाच्या दिवशी या आघाडीच्या अनेक समर्थकांनी मौनध्यानाचा आसरा घेतला आहे. उद्यापासून पुन्हा मोदी यांच्या चारित्र्यहननासाठी विरोधकांच्या फळीतील बिनीचे मोहरे राहुल गांधी यांच्या हातात हात घालून कामाला लागतील, तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी नव्या भारताच्या निर्मितीच्या नवसंकल्प पूर्तीकरिता आखलेल्या पहिल्या १०० दिवसांच्या योजनेची अंमलबजावणी सुरूदेखील झालेली असेल.
 
 
 
 
‘फिर एक बार मोदी सरकार' या भाजपाच्या घोषणेस देशातील मतदारांनी भरभरून कौल दिला, असे रविवारी विविध माध्यमांनी व निवडणूक विश्लेषकांनी जाहीर केलेल्या आकडेवारीवरून जाहीर झाले. त्याच्या काही तास अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कन्याकुमारीतील विवेकानंद शिलास्मारकाच्या साक्षीने सुरू केलेल्या ध्यानधारणेची सांगता केली होती. हा कौल जाहीर झाल्यानंतरच्या त्यांच्या प्रतिक्रियेतून विरोधकांच्या या हनननीतीचा संयत शब्दांतील समाचार बरेच काही सांगून जातो. Exit Poll-Narendra Modi आता देशाच्या अमृतकाळाच्या नव्या उमेदीने सुरू झालेल्या वाटचालीत विरोधकांकडून पुन्हा एकदा राजकारणाचे तेच जुने फासे खेळविले जाणार की विधायक व रचनात्मक कामात सहकार्य करून देशाचे भवितव्य घडविण्याच्या संकल्पात सहभागी होणार, त्याचे उत्तर शोधावे लागणार आहे. मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज जाहीर होताच मोदी यांनी पुढील १०० दिवसांच्या संकल्पपूर्तीच्या दिशेने कामास सुरुवात केली. तिसऱ्या वेळी सत्ताग्रहण केल्यानंतर करावयाच्या कामांची संकल्पसूची तयार असल्याची ग्वाही मोदी यांनी विविध प्रचारसभांमधून दिली होती. मोदी यांच्या प्रचारनीतीतही विकासाच्या मुद्यांवरच भर राहिल्याने, विरोधकांच्या प्रतिमाहनन मोहिमा निष्प्रभ ठरल्याचे स्पष्ट चित्र मतदानोत्तर चाचण्यांच्या निकालातून उमटले आहे.
 
 
 
 
Exit Poll-Narendra Modi लोकसभा निवडणुकांचे अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर प्राधान्याने कोणते प्रश्न सोडवायचे, याचा मोदी यांच्या मनातील आराखडा स्पष्ट आहे. उष्णतेच्या लाटांचे तडाखे, संभाव्य अतिवृष्टीची संकटे, नैसर्गिक आपत्तींमध्ये करावयाच्या मदतकार्याची आखणी आदी बाबींवर मोदी यांनी रविवारच्या बैठकीत अधिकाèयांशी चर्चा केली. तीन दिवस कन्याकुमारी येथील आध्यात्मिक यात्रेनंतरच्या कामकाजाचा मोदी यांचा पहिला दिवस अशा रीतीने व्यस्ततेत पार पाडला आहे. मोदी कधी थकत नाहीत, अशी त्यांची ख्याती आहे. माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस समाजाच्या सेवेसाठी आणि राष्ट्राच्या हिताकरिता समर्पित आहे, अशी ग्वाही प्रचारादरम्यानच्या प्रत्येक सभेत मोदी यांनी दिली होती. प्रचारासाठी केलेल्या भाषणांतील आश्वासने पुढे विसरायची असतात, असा सर्वसाधारण समज असतो. Exit Poll-Narendra Modi मात्र, मोदी यांची ही ग्वाहीदेखील जनता विसरणार नाही. पाच वर्षांपूर्वीची राहुल गांधी यांनी केलेली मोदी प्रतिमाहननाची दर्पोक्ती आणि आता मोदी यांनी दिलेली समर्पित राष्ट्रसेवेची ग्वाही या दोन्ही गोष्टी राजकारणाच्या इतिहासातून कधीच पुसल्या जाणार नाहीत. कारण या दोन बाबींमध्ये या नेत्यांच्या राष्ट्रभावना आणि राजकीय मानसिकतेचे प्रतिबिंब उमटलेले आहे.