धर्म-संस्कृती
- प्रा. दिलीप जोशी
Indian Culture-Education ‘सा विद्या या विमुक्तये ।' हे अनेक शैक्षणिक संस्था, शाळांचे ब्रिदवाक्य आहे. खरं तर भारतीय शिक्षण व्यवस्थेचं ते पूर्वापार ध्येय आहे. विष्णुपुराणात श्लोक आहे.
तत्कर्म यन्नबंधाय, सा विद्या या विमुक्तये ।
आयासाया परम कर्म, विद्यान्या शिल्प नैपुनम् ।।Indian Culture-Education
कर्म तेच जे आपल्याला बंधनात बांधत नाही. विद्या तीच जी माणसाला जीवनमुक्त करते. जे कर्म बंधमुक्त करत नसेल तर ती निरर्थक क्रिया होईल. विद्या जर विमुक्त करीत नसेल तर ते केवळ नैपुण्य किंवा कौशल्य म्हणावे लागेल. शिक्षण हे व्यक्तीला जीवनमुक्त करणारे असावे म्हणजे काय? तर, त्याने आपले जीवन नैतिक मूल्याधारित जगावे. Indian Culture-Education विमुक्त शब्द मुक्तपासून झाला. मुक्त होणे म्हणजे लौकिकार्थाने एखाद्याला बांधला, कोंडला असेल त्याची सुटका करणे. व्यापक अर्थ घेतला तर जन्म-मरणाच्या बंधनातून सोडवणूक म्हणजे मुक्ती. मुक्ती चार प्रकारांच्या आहेत. समिपता, सलोकता, सरूपता आणि सायुज्यता. ही मुक्ती मिळावी यासाठी आयुष्यभर त्यायोग्य वागणे, तसा आचारविचार ठेवणे, नैतिक वागणे या सर्व वागणुकीला विमुक्त जीवन जगणे म्हणतात. Indian Culture-Education मुक्तीची प्राथमिक अवस्था म्हणजे विमुक्त जीवन होय. हेच जीवनमुक्त माणसाचे लक्षण होय. मुक्ती ही पारलौकिक सुख देते तर विमुक्ती ही ईहलोकीचा आनंद आणि विवेक प्रदान करते. हेच भारतीय विद्यार्जनात रुजविल्या जात असे.

अनादिकाळापासून सन १९३५ पर्यंत भारतीय शिक्षण याच ध्येयावर घेतले जात असे. जगातून विद्यार्थी भारतवर्षात शिक्षण घेण्यासाठी येत. Indian Culture-Education भारतात प्रत्येक गावात गुरुकुल असे. जवळ जवळ सात लक्ष गुरुकुल भारतात होते. ४४ हजारांच्या वर महाविद्यालय इथे होते. नालंदा विद्यापीठासारख्या विश्वविद्यालयाची विद्यार्थी क्षमता १० हजार असायची. इथे प्रवेश मिळावा म्हणून होणाèया प्रवेशपूर्व चाचणीला जगभरातून एक लाख विद्यार्थी येत असत. १० हजार विद्यार्थ्यांना नालंदामध्ये प्रवेश मिळत असे तर उर्वरित जगातून आलेल्या ९० हजार विद्यार्थ्यांना आजूबाजूच्या विद्यापीठात सामावून घेतले जात असे. थोडक्यात शिक्षण ही चारित्र्यसंपन्न मनुष्य निर्माणाची प्रक्रिया होती. तुम्ही अंधारात कसे वागता याला चारित्र्य म्हणतात. सर्व माणसे सदासर्वकाळ नीतिमान असल्यामुळे इथे रामराज्य नांदत होते. भारतात सर्वच माणसे तृप्त आणि सदाचारी का होते? तर, End of knowledge is wisdom and End of wisdom is freedom हे सूत्र सर्वांच्याच जीवनात उतरत असे. म्हणजे ज्ञानाची परमोच्च पातळी गाठली की माणसात विवेक उत्पन्न होतो आणि विवेकाची परमोच्च पातळी गाठली की माणूस जीवनमुक्त होतो. सारासार विवेकक्षमता शिक्षणातून मिळत असे. त्यामुळेच नीतिमत्ता, निर्णयक्षमता, इतरांप्रती सहृदयता यामुळे ‘आत्मनो मोक्षार्थं, जगद्हितायच' हे सूत्र मिळालेल्या विद्येतून सहज प्राप्त होत असे. Indian Culture-Education म्हणून ‘सा विद्या या विमुक्तये' हे शिक्षणाचे उद्दिष्ट रुजविणे सहज शक्य होत असे.
विष्णुपुराणातच अजून एक श्लोक आहे.
विद्या ददाती विनयम, विनयाद् याती पात्रताम् ।
पात्रत्वात धनमाप्नोति, धनाद् धर्मम ततः सुखम् ।।
मला मिळणारी विद्या ही मुक्तकरी विद्या आहे, पण मुक्त होण्यासाठी इहलोकीची यात्रा सुकर करणे गरजेचे म्हणजे माझा गृहस्थाश्रम नेटका हवा. हे करण्यासाठी मला पात्रता कमवावी लागेल. याला ‘युक्तकरी विद्या' म्हणतात. युक्त झालो म्हणजे माझा संसारही नेटका चालण्यासाठी धन म्हणजे पैसा आवश्यक आहे. Indian Culture-Education म्हणून विद्या ही अर्थकरी असावी. शिक्षणातून संसार चालविण्याचे कौशल्य मिळावे. विद्येतून मिळालेल्या अर्थातून जगातली सर्व सुखे मिळवा, पण कमावलेला अर्थ म्हणजे धन हे नैतिक मार्गाने आलेलं असावं म्हणजे विद्या ही धर्मकरी म्हणजे नैतिक मूल्य रुजविणारी असावी. त्याचा क्रम मुक्तकरी, युक्तकरी, अर्थकरी आणि धर्मकरी असावा. हीच कडी उलट केली तर भारतीय संस्कृतीत सांगितलेले चार पुरुषार्थ धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष लक्षात येतील. ही अशी साखळी माणसाला विमुक्त करते. म्हणजे ऐश्वर्याचा विवेक निर्माण करते. यात हल्ली माणसं धर्मकार्य करतात आणि मोक्षाची अपेक्षा करतात. म्हणजे धर्मावरून एकदम मोक्षावर उडी मारतात. मधले अर्थ आणि काम सोयीस्कर विसरतात. Indian Culture-Education पण धर्मकार्यासाठी वापरलेला अर्थ कशा मार्गाने आला, आपल्या जीवनात सुखोपभोगाचा स्वैराचार तर नाही ना? आणि चैनीसाठी वापरला जाणारा पैसा भ्रष्ट मार्गाचा तर नाही ना? हा विचार अत्यावश्यक आहे. हा विचार करायला लावते ती विद्या असते.
अन्यथा ती अविद्या. जीवनात सकारात्मकता आणते ती विद्या आणि सदासर्वदा नकारात्मकता आणते ती अविद्या. मनात दैवी विचार आणते ती विद्या आणि राक्षसी अविचार आणते ती अविद्या. विनय आणि सदाचार आणते ती विद्या. विद्येने विकासात्मक उकल होते. ज्या संस्कारातून मनुष्याचे व्यष्टीतून समष्टीमध्ये, समष्टीतून परमेष्टीमध्ये उदार उन्नयन होते. Indian Culture-Education ते संस्कार म्हणजे विद्या. जिच्यामुळे माणसाचा पोटाचा प्रश्न तर सुटतोच; पण पोटाच्या वर एक हृदय आहे; ज्याला मन म्हणतात. त्याच्याही वर एक मेंदू आहे; ज्याला बुद्धी म्हणतात. पोटासोबतच मन, मस्तिष्क आणि मनगटाला उदार करते ती विद्या. विद्या विमुक्त करते म्हणजे हृदय आकाशाला जगद्आकाशासी जोडते. म्हणजे मनुष्याला खèया अर्थाने मानव बनवून ‘नर का नारायण' होण्याचे संस्कार करते. Indian Culture-Education महाभारतात स्पष्ट सांगितले की, आहार, निद्रा, भय आणि मैथुन माणसाप्रमाणे प्राण्यांनाही असते. पण मनुष्याला मन, बुद्धी विशेष असते. म्हणून प्राणी योनी ही भोग योनी आहे. मनुष्य योनी मात्र कर्म योनी आहे. त्यामुळे सारासार विवेक मनुष्याला निसर्गतः प्रदत्त आहे. कर्म, अकर्म आणि विकर्म यांचे तारतम्य बाळगण्याची क्षमता मनुष्यात असते.
ही क्षमता म्हणजे ‘विमुक्तये' होय. देहबुद्धीला विद्येची जोड मिळाली की आपण मानव बनतो. मानवत्वाला विवेकाची जोड मिळाली की आपण माधव बनतो. ही मनुष्यनिर्माणाची कडी तोडली ती १९३५ नंतर मेकॅलोने! भारतीय शिक्षण पद्धतीत त्याने चंचुप्रवेश केला. खरं तर हा मेकॅलो शिक्षणतज्ज्ञ वगैरे नव्हता तर तो ईस्ट इंडिया कंपनीचा वकील होता. त्याच्याकडे भारतात किती गुरुकुल आहेत, याचे सर्वेक्षण दिले होते. Indian Culture-Education गावागावांत गुरुकुल पाहिल्यावर याचे वकिली डोके सुरू झाले. इथली माणसे शिक्षणातून पोट आणि पोटाच्या वरचे भाग हृदय आणि मेंदूचा विचार करतात. त्यामुळे हा देश मजबूत आहे. शिक्षणाचा हा वर जाणारा प्रवाह उलट केला पाहिजे. म्हणजे पोट आणि पोटाच्या वरचा भाग यांच्या शैक्षणिक संस्कारातून काढून टाकायचा आणि इथे असे शिक्षण द्यायचे; ज्यातून सर्व शिक्षार्थी पोट आणि पोटाखालचा भाग याचाच विचार करतील आणि तो यशस्वी झाला.
१९३५ नंतर भारतातील शिक्षणातून भारत हळूहळू काढला गेला. देव, देश, धर्म, समाज, सृष्टी याचा विचार संपून केवळ स्वार्थ, ऐहिक सुखे, स्वतः चैनीत राहणे, इतरांचा विचारच नाही अशी स्व-अर्थी पिढी निर्माण होऊ लागली. भारतीय मूल्याधारित शिक्षण संपुष्टात येऊ लागले. त्यातून मी आणि माझं हाच विचार करणारी पिढी निर्माण होऊ लागली. केवळ पैसा कमवायचा मग तो अनैतिक, भ्रष्ट मार्गाने आला तरी हरकत नाही. Indian Culture-Education आता पुन्हा नवीन शैक्षणिक धोरणात पोटाच्या खाली वाहणारा हा शैक्षणिक प्रवाह पुन्हा मन आणि मस्तिष्काकडे प्रवाहित होईल. मी आणि माझं या विचाराला माझं, तुझं आणि सर्वांचं या विचारात रूपांतरित करता येईल. या संपूर्ण प्रक्रियेतून मिळणारे शिक्षण विवेकी मनुष्य निर्माण करणारे शिक्षण राहील. हेच तर ‘सा विद्या या विमुक्तये ।' आहे. या ध्येयाने प्रेरित शिक्षण या देशाचे गतवैभव पुन्हा प्राप्त करून देईल, हा विश्वास.
९८२२२६२७३५