कारंजा लाड,
Mahavir Library कारंजा हे शिक्षणाचे माहेरघर आहे तसेच श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे जन्म स्थान असून, श्री जैनांची काशी म्हणून कारंजा शहराची ओळख आहे. श्री भगवान महावीर वाचनालय व अभ्यासिका हे सुरळीत पणे चालू असताना मागील एक वर्षा आधी तत्कालीन मुख्याधिकारी दादाराव डोलारकर यांनी वाचनालयाचे काम व्यवस्थित करण्यासाठी काही दिवस बंद ठेवून मुलांना पर्याय व्यवस्था करून दिली होती.
पण निव्वळ हा देखावा होता. त्यांनी वाचनालय अभ्यासिका बंद करून स्वतःच कार्यालय त्या जागी तयार केले. त्यामुळे हे वाचनालय व अभ्यासिका बंद असून, ते सुरु करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. तत्कालीन मुख्याधिकारी यांनी विद्यार्थ्यांसाठी निष्कृष्ट दर्जाचे व शिकस्त इमारत वाचनालय व अभ्यासिकासाठी उपलब्ध करून दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जी आधीची जागा होती त्याच ठिकाणी श्री भगवान महावीर वाचनालय सुरळीत करण्यासाठी मागणी केली आहे.Mahavir Library मुख्याधिकारी यांनी विचारपूर्वक गांभीर्याने हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देतांना शेख सलीम शेख रहीम, नीरज अगमे, लक्ष्मण बागडे, गौरव राजुरकर, सागर पांडे, अब्दुल बशीर यांची उपस्थिती होती.