Surya Grahan 2024 : हिंदू धर्मात चंद्र आणि सूर्यग्रहण या दोन्हींना धार्मिक महत्त्व आहे. धार्मिक दृष्टिकोनातून ग्रहणाचा काळ शुभ मानला जात नाही. या काळात अशी अनेक कामे करण्यास मनाई आहे. 2024 वर्षातील पहिले सूर्यग्रहण 8 एप्रिल 2024 रोजी झाले. मात्र, पहिले सूर्यग्रहण भारतात दिसले नाही. चला तर मग आता जाणून घेऊया या वर्षातील दुसरे सूर्यग्रहण कधी होणार आहे.
हेही वाचा :
जूनमध्ये ग्रहांचे फेरबदल या राशींचे नशीब उजळणार
2024 मध्ये दुसरे सूर्यग्रहण कधी आहे?
2024 सालातील दुसरे सूर्यग्रहण 2 ऑक्टोबर रोजी होणार आहे. ग्रहणाचा कालावधी बराच मोठा असेल. सूर्यग्रहण रात्री ९:१३ ते दुसऱ्या दिवशी म्हणजे ३ ऑक्टोबर रोजी पहाटे ३:१७ पर्यंत राहील. दुसऱ्या सूर्यग्रहणाचा कालावधी सुमारे 6 तासांचा असेल.
दुसरे सूर्यग्रहण कुठे दिसणार?
वर्षातील दुसरे सूर्यग्रहणही भारतात दिसणार नाही. 2 ऑक्टोबर 2024 रोजी दुसरे ग्रहण अमेरिका, अर्जेंटिना, अंटार्क्टिका, उरुग्वे, होनोलुलू, ब्यूनस आयर्स, आर्क्टिक, पॅसिफिक महासागर, पेरी, चिली आणि बेटाच्या उत्तरेकडील भागात दिसणार आहे.
सूर्यग्रहण 2024 सुतक कालावधी
2024 सालातील दुसरे सूर्यग्रहण 2 ऑक्टोबर रोजी होत आहे. मात्र हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. यामुळे, सुतक कालावधी देखील वैध राहणार नाही. सुतक कालावधी सूर्यग्रहणाच्या १२ तास आधी सुरू होतो. सुतक काळात मंदिरांचे दरवाजे बंद केले जातात. सुतक काळात पूजा आणि कोणतेही शुभ, धार्मिक कार्य करण्यास मनाई आहे. ग्रहण काळात गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी. सुतक काळात देवाचे नाव घ्यावे आणि मंत्रांचा जप करावा, असे सांगितले जाते. मंत्रांचा जप केल्याने ग्रहणाचे दुष्परिणाम कमी होतात.
(अस्वीकरण: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे. त्यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. तरुण भारत एकाही गोष्टीच्या सत्यतेचा पुरावा देत नाही.)