पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन फुटली

जागो जागी पिण्याच्या पाण्याची नासाडी

    दिनांक :04-Jun-2024
Total Views |
मंगरूळनाथ, 
water supply scheme शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी न.प.प्रशासनाच्या तीन जलकूंभ असूनही शहरच्या अनेक भागात पाणी पोहचणे दुर्मिळ झाले आहे. सबंधित विभागाच्या भोंगळ कारभारामुळे काही ठिकाणी संकट तर काही ठिकाणी वाया जात आहे.सांगायचे झाल्यास मोतसावंगा धरणातून पुरवठा होणारे पाणी पाईप फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे, त्यामुळे ही पाईपलाईन तात्काळ दुरुस्त करून पाण्याचा अपव्यय थांबविणे गरजेचे आहे.
 

bcbn 
 
 
मानोली रोड गावाजवळ पाईप फुटल्याने मोतसावगा धरणातून येथील नागरिकांना जीवनोपयोगी असणारे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. मानोली गावाजवळ पाइप पाच दिवसांपूर्वी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. न प विभाग झोपेत आहे. पाणी पुरवठा विभागाने सक्रीय असले पाहीजे. एकीकडे या कडायाच्या उन्हात पाण्यासाठी ओरड सुरू असताना दुसरीकडे हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. शहरातील घरोघरी पाणीपुरवठा करण्यासाठी नगर परिषदेच्या विविध योजना सुरू आहेत, काही लोक पाणी चोरत आहेत आणि प्रत्येकाला सर्व माहिती असूनही ती दुरुस्त करण्यासाठी अद्याप कोणतीही यंत्रणा नाही. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असल्याचे चित्र दिसत आहे. पिण्याच्या पाण्याचे स्रोत पूर्ण भरले असूनही घसा ओलावण्यासाठी महीला पुरुषांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.पालिकेकडे साधन व मनुष्यबळच्या कमतरतेमुळे दररोज लोकांपर्यंत पाणी पोहोचत नाही. त्यासाठी छोटे फिल्टर प्लांट, दाट वस्तीतील जुन्या पाइपलाइनसह अनेक समस्या गणल्या जातात.water supply scheme पाण्याचा प्रवाह कमी असल्याने दाट वस्त्यांमध्ये नळांमध्ये फारच कमी पाणी उपलब्ध आहे. शुद्ध पाण्याच्या नावावर वर्षाकाठी लाखोंहून अधिक खर्च करूनही जुने फिल्टर प्लांट आणि जुन्या पाइपलाइन शहरवासीयांना शुद्ध पाणी पुरवण्यात अपयशी ठरत आहेत. जागोजागी गळकी असलेली पाण्याची पाईप लाईन त्वरित दुरुस्त करणे गरजेचे आहे.