ट्रकच्या अपघातात वनरक्षक ठार

05 Jun 2024 18:37:24
गडचिरोली,
truck accident भरधाव वेगाने विरूद्ध दिशेने येणार्‍या ट्रकने दुचाकीस धडक दिल्याने दुचाकीस्वार वनरक्षक जागीच ठार झाल्याची घटना 3 जून रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास एटापल्लीपासून दोन किमी अंतरावर आलापल्ली मार्गावरील ‘बाबा का ढाबा’ समोर घडली. मनोज नरोटी रा. घोटसुर असे मृतकाचे नाव आहे.
 

dfgdg 
 
प्राप्त माहितीनुसार मृतक वनरक्षक मनोज नरोटी हा आपल्या दुचाकीने आलापल्लीवरून एटापल्लीकडे येत असतांना समोरून येणार्‍या ट्रकने मोटार सायकलला जोरदार धडक दिली. मोटार सायकल चालकाच्या डोक्यावरून ट्रक जाऊन डोक्याचा मेंदु बाहेर पडला.truck accident पोलिसांनी पंचनामा करून प्रेत शवविच्छेदन करीता एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात पाठविले. पुढील तपास पोलिस निरीक्षक कुकडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिंदे व म्हेत्रे हे करीत आहेत. दरम्यान एटापल्ली आलापल्ली मार्गावर वाढत्या अपघाताने चिंता व्यक्त होत आहे.
Powered By Sangraha 9.0