हिंगोली लोकसभेत नागेश पाटील विजयी

05 Jun 2024 18:09:33
- नोटाला 3 हजार 123 मतदारांची पसंती

हिंगोली, 
Hingoli Lok Sabha : हिंगोली लोकसभा मतदारसंघातून उबाठा शिवसेनेचे नागेश आष्टीकर हे 1 लाख 8 हजार 602 मतांनी विजयी झाल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी घोषित करून त्यांना प्रमाणपत्र प्रदान केले. विजयी उमेदवार नागेश आष्टीकर यांनी 26 व्या फेरीअखेरीस टपाली मतदानासह त्यांना 4 लाख 92 हजार 535 मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार बाबुराव कदम यांना 3 लाख 83 हजार 933 मते मिळाली. तर तिसर्‍या क‘मांकाची मते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. बी. डी. चव्हाण यांना 1 लाख 61 हजार 814 मिळाली.
 
 
y4Jun-Nagesh-Patil
 
उर्वरित उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाण आहेत. गजानन डाळ (बसपा) 7,465, विजय गाभणे (माकप) 14,644, अनिल मोहिते (अभापपा) 3,374, अ‍ॅड. अलताफ अहेमद (इंनॅ लीग) 2,950, वर्षा शिवाजीराव देवसरकर (बमुपा) 4,099, देशा श्याम बंजारा (सजपा) 2,063, प्रकाश रणवीर (रिपाइं ए) 2,102, रवी जाधव (अभाज) 1,602, सुनील इंगोले (भीमसेना) 1,027, हेमंत कनाके (राकिबपा) 1,800, त्रिशला मिलिंद कांबळे (बसपा-आंबेडकर) 2,150.
 
 
अशोक राठोड (अपक्ष) 2,906, आनंद धुळे (अपक्ष) 9,817, अंबादास गाडे (अपक्ष) 14,742, अ. कदिर मस्तान (अपक्ष) 3,713, दत्ता सूर्यवंशी (अपक्ष) 7,239, देवजी आसोले (अपक्ष) 1,483. बाबुराव कदम (अपक्ष) 4,482, भवर फुलाजी (अपक्ष) 2,146, महेश नप्ते (अपक्ष) 2,299, अ‍ॅड. रवी शिंदे (अपक्ष) 2,701.
 
Hingoli Lok Sabha : रामप्रसाद बांगर (अपक्ष) 4,525, अ‍ॅड. रामराव जुंबडे (अपक्ष) 2,103, वसंत पाईकराव (अपक्ष) 593, विजय राऊत (अपक्ष) 1,126, विश्वनाथ फाळेगावकर (अपक्ष) 1,859, अ‍ॅड. शिवाजीराव जाधव (अपक्ष) 2,214, सत्तार पठाण (अपक्ष) 2,463, सर्जेराव खंदारे (अपक्ष) 5,014 आणि सुनील गजभार (अपक्ष) 3,192.
 
नोटाला टपाली मतदानासह 3,123 मतदारांनी पसंती दर्शविली असून 11 लाख 59 हजार 298 मते वैध ठरली आहेत. अवैध मते 446 आणि 15 टेंडर्ड मते पडली असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी घोषित केले.
Powered By Sangraha 9.0