विजेचे ‘स्मार्ट मीटर'...फायद्याचे की तोट्याचे?

MSEB-Electricity Meter वीज बिल नगण्य यावे

    दिनांक :05-Jun-2024
Total Views |
वेध 
 
 
- गिरीश शेरेकर
MSEB-Electricity Meter वीज पुरवठ्याचे योग्य नियोजन व्हावे म्हणून केंद्र सरकारने प्रत्येक ग्राहकाच्या घरी स्मार्ट मीटर लावण्याचे धोरण आखले आहे. त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात होणार आहे. जवळपास सव्वादोन कोटी ग्राहकांच्या घरी हे मीटर लावण्याचे प्रस्तावित आहे. MSEB-Electricity Meter महावितरण कंपनीने आपल्या कार्यालयांपासून मीटर लावण्याचे कार्य सुरू केले आहे. स्मार्ट मीटर फायद्याचे की तोट्याचे या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. विद्यमान स्थितीत जे मीटर ग्राहकांच्या घरी आहे, ते बदलविण्याचे अभियान जवळपास २० वर्षांपूर्वी असेच हाती घेण्यात आले होते. MSEB-Electricity Meter त्यावेळीसुद्धा प्रचंड विरोध झाला होता. जुन्या मीटरपेक्षा नवे मीटर खूप वेगाने फिरतात आणि बिल जास्त येईल, असा समज प्रत्येक ग्राहकाचा झाला होता. हळूहळू तो दूर करण्यात आला. MSEB-Electricity Meter घरोघरी मीटर त्यावेळी लावण्यात आले. हे मीटर लावण्याचा निर्णय जेव्हा घेण्यात आला होता, त्याचे मूळ कारण जुन्या मीटरमध्ये व्यापक प्रमाणात झालेली गडबड!
 
 

MSEB-Electricity Meter 
 
 
वीज बिल नगण्य यावे म्हणून अनेक ग्राहकांनी ती खटाटोप केली होती. या गडबडीने, वीज गळतीने व ग्राहकांकडे थकलेल्या रकमेमुळे तेव्हाच्या वीज मंडळाचे प्रचंड नुकसान झाले. हे मंडळ कायम तोट्यात होते. त्याला या चक्रव्यूहातून बाहेर काढण्यासाठी व्यापक धोरण ठरविण्यात आले. MSEB-Electricity Meter सुरुवात मीटर बदलविणे, वीज गळती थांबविण्यासह अन्य उपाययोजनांपासून तर वीज मंडळाचे तीन वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये विभाजन करण्यापर्यंतचा हा पहिल्या टप्प्यातील प्रवास आहे. वीज कंपनीमार्फत संचालन सुरू झाल्यावर सुधारणांचा वेग अधिक वाढला. गेल्या १० वर्षांत अनेक चांगल्या सुधारणा झाल्या. काटेकोर वसुली, वीज गळती आणि चोरीला आळा घालण्यासाठी निरंतर मोहीम, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविणे या प्रमुख सुधारणांमुळे वीज विभाग समाधानकारक स्थितीत पोहोचला. MSEB-Electricity Meter ही स्थिती कायम ठेवण्यासाठी बदलते तंत्रज्ञान स्वीकारून नवी कार्यप्रणाली विकसित करावी लागते. बदल हा प्रगतीचा मार्ग आहे. नवे स्मार्ट मीटर लावण्याचा निर्णय त्याच मार्गाचा एक भाग आहे. सुरुवातीला पोस्टपेड व नंतर प्रीपेड होणाऱ्या या मीटरचा प्रमुख फायदा थकबाकी व वसुलीचा विषय संपून चोरीची डोकेदुखी पूर्णपणे कमी होणार आहे. वीज गळती थांबविण्यासाठी हे मीटर उपयोगी पडणार नाही. कारण, वीज वाहिन्यांवर आकोडे टाकून वीज घेणारे गळतीच्या कक्षेत येतात. त्यांचा आणि मीटरचा संबंधच नाही.
 
 
 
MSEB-Electricity Meter महावितरणने गळतीवर अद्याप ठोस उपाय शोधलेला नाही. गळतीचे प्रमाण मात्र पूर्वीपेक्षा कमी झाले पण, ही तूट नियमित बिल भरणाऱ्यांकडून वसूल केली जाते. हा एक प्रकारचा अन्यायच आहे. नवे स्मार्ट मीटर जेव्हा कार्यरत होतील, त्यावेळी अशी व अन्य छुपी वसुली नेहमीप्रमाणेच होईल की बंद होणार, याकडे लक्ष ठेवावे लागेल. महावितरणच्या म्हणण्यानुसार सध्याच्या मीटरच्या बाबतीत चुकीचे रिडिंग होणे, चुकीची बिल येणे अशा काही समस्या होत्या. त्या स्मार्ट मीटरमुळे निकाली निघेल. हे मीटर मोबाईलप्रमाणेच घरबसल्या ग्राहकांना रिचार्ज करता येणार आहे. या रकमेतून दररोज किती वीज वापरली, रक्कम किती शिल्लक आहे, याची माहिती मोबाईलवरच मिळेल. MSEB-Electricity Meter ग्राहकांच्या सोयीसाठी ‘हॅपी अवर्स' ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. रिचार्ज संपल्यानंतर सायंकाळी ६ ते सकाळी १० वाजेपर्यंत आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशी वीज खंडित होणार नाही. हॅपी अवर्समध्ये वापरलेल्या विजेचे पैसे रिचार्ज केल्यानंतर कपात होणार आहे. देशात मध्यप्रदेश, बिहार, जम्मू-काश्मीर, उत्तरप्रदेश व अन्य राज्यांत स्मार्ट मीटरचा वापर होत असल्याचे महावितरण सांगत आहे.
 
 
 
दुसरीकडे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने स्मार्ट मीटरसंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले आहेत. नव्या मीटरचा प्रतिग्राहक खर्च १२ हजार आहे. केंद्र सरकार ९०० रुपये प्रतिमीटर अनुदान देणार आहे. उर्वरित ११ हजार १०० रुपयांची रक्कम वीज ग्राहकांकडून वसूल केली जाणार आहे. MSEB-Electricity Meter त्यासाठी ग्राहकांवर प्रती युनिट ३० पैसे अतिरिक्त भुर्दंड लावण्यात येईल, असा संशय संघटनेला आहे. त्याला संघटनेचा विरोध असून त्यांची आंदोलनाची तयारी आहे. दुसèया एका संघटनेने स्मार्ट मीटर ग्राहकांची फसवणूक करणारे व कंपन्यांना फायदा पोहोचविणारे आहे, असा आरोप करून विरोधाची भूमिका घेतली आहे. राज्यस्तरावर स्मार्ट मीटर विरोधी नागरी संघर्ष समिती त्यांनी गठित केली आहे. या समितीने ६ जूनला सर्वच जिल्ह्यात आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. त्याला प्रतिसाद कसा मिळतो त्यावरच विरोधाची तीव्रता अवलंबून राहील. वीज ग्राहकांचा महावितरणवर कायम संशय असल्याने नवे मीटर कितीही फायद्याचे असले, तरी प्रश्न उपस्थित होतीलच. त्या प्रश्नांची उत्तरे ग्राहकांचे समाधान करणारी व कामगारांचे हित जोपासणारी राहिली तरच महावितरणचा स्मार्ट मीटरचा मार्ग सुकर होईल.MSEB-Electricity Meter
९४२०७२१२२५