- 720 पैकी 720 गुण पटकावले
- यवतमाळ जिल्ह्यासाठी अभिमानास्पद गोष्ट
उमरखेड,
नुकताच ‘नीट’चा निकाल लागला असून यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडच्या Neha Mane नेहा कुलदीप माने हिने 720 पैकी 720 गुणांसह देशात सर्वप्रथम येण्याचा मान पटकावला आहे. नीटमध्ये प्रथमच 67 विद्यार्थ्यांनी 720 पैकी 720 गुण मिळविले असून त्यात महाराष्ट्रातील 11 विद्यार्थी आहेत. शिक्षक कुलदीप माने यांची मुलगी नेहा ही उमरखेड तालुक्यातील बोरी (चातारी) येथील रहिवासी, उमरखेड ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक, निवृत्त उपविभागीय अधिकारी रामराव माने यांची नात आहे. अत्यंत कुशाग‘ बुद्धिमत्तेची अभ्यासू नेहा लहाणपणापासूनच गुणवत्तेत आघाडीवर आहे.
Neha Mane : माने परिवाराची लेक नेहा धानोरा येथील निवृत्त प्राचार्य डॉ. प्र. भा. काळे यांची नात आहे. नेहाने दहावीमध्ये 97 टक्के आणि बारावीत 81 टक्के गुण घेतले आहेत. नेहाची एम्समध्ये प्रवेश घेण्याची इच्छा आहे. लवकरच तिचा प्रवेश एम्समध्ये होऊ शकतो. नेहा माने हिने पहिली ते आठवी शिक्षण उमरखेडच्या श्री गुरुदेव गोरोबा विद्यालयात घेऊन नववी ते दहावी नांदेडच्या महात्मा फुले विद्यालयातून केले. अकरावी व बारावी नांदेडच्या गोदावरी कनिष्ठ महाविद्यालयातनून केले, नेहा आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यवतमाळ जिल्ह्यात प्रथम होती. डॉ. होमी भाभा विज्ञान केंद्रातून सुवर्णपदक प्राप्त करणारी जिल्ह्यातून एकमेव होती. नीटची अतीकठीण परीक्षा नेहाने पहिल्याच प्रयत्नात, देशात पहिले स्थान मिळवून उत्तीर्ण केली आहे. एक उत्कृष्ट डॉक्टर होण्याचा नेहाचा मानस असून या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.