जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

एसएमसीइंग्लिश स्कूलचा उपक्रम

    दिनांक :05-Jun-2024
Total Views |
वाशीम, 
Environment Day प्रदूषणाच्या समस्येने सर्वत्र उग्र रूप धारण केलेले असून, पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक झाले आहे. या संबंधी समाजाला जागृत करण्यासाठी व समाजामध्ये वृक्षारोपण व संवर्धनासाठी जनजागृती करण्यासाठी ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून स्थानिक एएमसी इंग्लिश स्कूल वाशीम येथे निसर्ग इको लब व सामाजिक वनिकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
 
 
xfghf
 
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्य मीना उबगडे, पर्यवेक्षिका प्रणीता हरसुले होत्या, प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक वनीकरण विभागाचे सहायक वनसंरक्षक राजेंद्र कातखेडे होते. यावेळी उपस्थित मान्यवर व राष्ट्रीय हरीत सेनेचे चिमुकले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पर्यावरणाच्या व समाजाच्या दृष्टीने वृक्षारोपण व संवर्धन कसे महत्त्वाचे आहे याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन व संचलन राष्ट्रीय हरितसेनेचे समन्वयक अभिजीत जोशी यांनी केले. वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निसर्ग ईको लबचे चिमुकल्यांनी परिश्रम घेतले.Environment Day सदर उपक्रम एसएमसी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. हरिभाऊ क्षिरसागर, प्राचार्य मीना उबगडे, विभागीय वन अधिकारी अशोक पर्‍हाड व राष्ट्रीय हरीत सेनेचे समन्वयक अभिजीत जोशी यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला.