अल्पवयीन आरोपीची कोठडी वाढवा

    दिनांक :05-Jun-2024
Total Views |
पुणे अपघात प्रकरण, पोलिसांचे बालन्यायमंडळाला पत्र
 
पुणे, 
Porsche car accident : कल्याणीनगर भागात भरधाव कारने दोन जणांना चिरडणार्‍या अल्पवयीन आरोपीच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी पोलिसांनी पत्राद्बारे बालन्याय मंडळाकडे केली आहे. प्रकरणाचा तपास करण्यासाठी 17 वर्षीय आरोपीची चौकशी करण्याची आवश्यकता असून, पुन्हा 14 दिवसांची कोठडी वाढविण्यात यावी, असा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे.
 
 
Porsche car accident
 
Porsche car accident : पोलिस अधिकार्‍याने सांगितले की, अल्पवयीन आरोपीची बाल निरीक्षण गृहताील कोठडी 6 जून रोजी संपणार असून, त्यानंतर त्याची सुटका होऊ शकते. आरोपी वाहन चालविताना दारूच्या नशेत असल्याचे तपासात समोर आले आहे. सध्या आरोपीचे वडील विशाल अग‘वाल, आई व आजोबा पोलिस कोठडीत आहे. ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना रक्ताच्या नमुने बदलल्याप्रकरणी अटक केली आहे. याप्रकरणी अजून काही आरोपींची चौकशी होणार आहे. प्रकरणाचा छडा लावण्यासाठी अल्पवयीन आरोपीच्या चौकशीची गरज असल्याने न्यायमंडळला त्याच्या कोठडीत वाढ करण्यासाठी पत्र दिले आहे.
आमदाराच्या दोन निकटवर्तीयांना अटक
Porsche car accident : पोर्शे कार अपघाताचा सखोल तपास सुरू असताना बुधवारी पोलिसांनी एका आमदाराच्या दोन निकटवर्तीयांना अटक केली आहे. अश्फाक मकानदार आणि अमर गायकवाड अशी त्यांची नावे असून, त्यांना पुणे सत्र न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायाधीशांनी त्यांना 10 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. आरोपींच्या माध्यमातूनच दोन डॉक्टरांना रक्ताचे नमुने फेरफार करण्यासाठी तीन लाख रुपये दिले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आमदाराचे नाव मात्र पोलिसांनी उघड केले नाही.