राज्यात ‘नोटा’ला मिळाली 4 लाख 12 हजार 332 मते

    दिनांक :07-Jun-2024
Total Views |
- रायगड मतदारसंघात सर्वाधिक 27,270
- गडचिरोली-चिमूर मतदारसंघात 16, 577 मते
 
नागेश दाचेवार
मुंबई, 
'NOTA' votes : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील 48 मतदारसंघात ‘नोटा’ला एकूण 4 लाख 12 हजार 332 मते मिळाली असून, ही राज्यात झालेल्या एकूण मतदानाच्या 0.72 टक्के आहे. यात सर्वाधिक रायगड मतदारसंघात 27,270 मते ‘नोटा’ला पडली असून, दुसर्‍या क्रमांकाची 23, 385 मते पालघर मतदारसंघात पडली आहेत.
 
 
Nota
 
'NOTA' votes : महाराष्ट्रात झालेल्या मतदानात रायगड, पालघरनंतर ठाणे येथे तिसर्‍या क्रमांकाची सर्वाधिक 17,901 मते तर, मावळ येथे चवथ्या क्रमांकाची 16,760 एवढी मते ‘नोटा’ या पर्यायाला पडली आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने 2013 मध्ये ‘नोटा’ (नन ऑफ द अबोव्ह) अर्थात ‘यापैकी नाही’ असा पर्याय इव्हीएमवर उपलब्ध करून दिला. तो 2014 च्या सावत्रिक निवडणुकीत पहिल्यांदा वापरण्यात आला.
विदर्भात गडचिरोली-चिमूर येथे सर्वाधिक पसंती
विदर्भातील 10 मतदारसंघापैकी गडचिरोली-चिमूर मतदारसंघात सर्वाधिक 16 हजार 577 एवढी पसंती ‘नोटा’ला मतदारांनी दिली असून, चंद्रपुरात दुसर्‍या क‘मांकाची 10,843 आणि भंडारा-गोंदिया मतदारसंघात 10,268 एवढी तिसर्‍या क्रमांकाची मते ‘नोटा’ला दिली आहेत.
विदर्भातील दहा मतदारसंघात ‘नोटा’ला मिळालेली मते
1. गडचिरोली-चिमूर - 16,577
2. चंद्रपूर - 10,843
3. भंडारा-गोंदिया - 10,268
4. यवतमाळ-वाशिम - 9,391
5. रामटेक - 7,827
6. अकोला - 5,783
7. नागपूर - 5,474
8. वर्धा - 4,634
9. बुलढाणा - 3,786
10. अमरावती - 2,544
मुंबईतील सहा मतदारसंघात मिळालेली मते
1. मुंबई उत्तर -पश्चिम- 15,161
2. मुंबई दक्षिण -मध्य- 13,423
3. मुंबई दक्षिण - 13,411
4. मुंबई उत्तर - 13,346
5. मुंबई उत्तर-पूर्व - 10,173
6. मुंबई उत्तर-मध्य - 9,749
उरर्वरित 32 मतदारसंघात मिळालेली मते
1. रायगड - 27,270
2. पालघर - 23,385
3. ठाणे - 17,901
4. मावळ - 16,760
5. नंदूरबार - 14,123
6. जळगाव - 13,919
7. कल्याण - 11,686
8. रत्नागिरी-सिंधुदुर्ग- 11643
9. शिरुर - 9,661
10. भिवंडी - 9,347
11. बारामती - 9,151
12. पुणे - 7,460
13. सांगली - 6,565
14. नाशिक- 6, 185
15. कोल्हापूर - 5,983
16. औरंगाबाद - 5,773
17. सातारा- 5, 522
18. शिर्डी - 5,380
19. हातकणंगले - 5,103
20. दिंडोरी - 4,998
21. धुळे - 4,693
22. उस्मानाबाद - 4,298
23. रावेर - 4,100
24. म्हाडा - 3,702
25. लातुर - 3,567
26. नांदेड - 3,628
27. परभणी - 3,385
28. जालना - 3,537
29. अहमदनगर - 3,282
30. हिंगोली - 3,123
31. सोलापूर - 2,725
32. बीड -2,087