कोकण पदवीधर निवडणुकीतून मनसेच्या अभिजीत पानसेंची माघार

    दिनांक :07-Jun-2024
Total Views |
- भाजपाच्या निरंजन डावखरेंना पाठिंबा

मुंबई, 
महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील मनसेचे उमेदवार अभिजीत पानसे यांनी निवडणुकीतून माघार घेतली असून, भाजपाचे उमेदवार निरंजन डावखरे यांना अपला पाठिंबा जाहीर केला आहे. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या चार जागांवर निवडणुका होऊ घातल्या आहेत. यातील कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातून मनसेने Abhijeet Panse  अभिजीत पानसे यांना उमेदवारी घोषित केली होती.
 
 
Niranjan Dawkhare-Abhijeet Panse
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन दिवसांपूर्वी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी राज ठाकरेंना उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली होती. फडणवीस यांच्या विनंतीला मान देऊन Abhijeet Panse अभिजीत पानसे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. निरंजन डावखरे आज राज ठाकरेंच्या भेटीसाठी आले होते. त्यांना राज ठाकरेंनी आशीर्वाद दिला असल्याने आता निरंजन डावखरे हेच कोकण पदवीधर निवडणुकीत आमचे उमेदवार असतील, असे मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी सांगितले. यावेळी भाजपा आमदार प्रसाद लाड देखील उपस्थित होते. लाड यांनी आमच्या विनंतीला मान देऊन राज ठाकरेंनी आपला उमेदवार माघारी घेऊ न, भाजपच्या उमदेवाराला पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले. मनसेच्या या निर्णयामुळे भाजपाचे उमेदवार निरंजन डावखरे यांचा मार्ग सुकर झाला आहे.