रशियात चार भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

    दिनांक :07-Jun-2024
Total Views |
मॉस्को, 
Death of Indian medical students in Russia : रशियातील सेंट पीटर्सबर्गजवळील नदीत चार भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला असून, त्यांचे मृतदेह लवकरात लवकर त्यांच्या नातेवाईकांकडे पाठविण्यासाठी देशातील भारतीय मिशन रशियन अधिकार्‍यांशी समन्वय साधत आहेत. 18-20 वयोगटातील दोन मुले आणि दोन मुली हे चार विद्यार्थी व्हेलिकी नोव्हगोरोड शहरातील जवळच्या नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होते.
 
 
VOLKHOV-RIVER
 
एक भारतीय विद्यार्थिनी समुद्रकिनार्‍यावरून वोल्खोव्ह नदीत बुडाली. संकटात सापडलेल्या विद्यार्थिनीला वाचविण्यासाठी तिच्या चार साथीदारांनी खूप प्रयत्न केले. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात आणखी तिघेही नदीत बुडाले. तिसर्‍या मुलाला स्थानिक लोकांनी सुरक्षितपणे बाहेर काढले, असे स्थानिक माध्यमाच्या वृत्तात म्हटले आहे. महाराष्ट्रातील चार विद्यार्थी - हर्षल अनंतराव देसले, जिशान अशपाक पिंजारी, जिया फिरोज पिंजारी आणि मलिक गुलामगौस मोहम्मद याकूब अशी या बुडालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. निशा भूपेश सोनवणे या पाचव्या विद्यार्थिनीला वाचवण्यात यश आले.
 
 
 
Death of Indian medical students in Russia : आम्ही मृतदेह लवकरच नातेवाईकांकडे पाठवण्याचे काम करीत आहोत. ज्या विद्यार्थिनीचा जीव वाचला आहे, तिच्यावर योग्य उपचार केले जात आहेत, असे मॉस्कोमधील भारतीय दूतावासाने सांगितले. शोक झालेल्या कुटुंबांप्रती मनापासून शोक व्यक्त करतो, असे सेंट पीटर्सबर्ग येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने म्हटले आहे. आम्ही शक्य तितक्या लवकर मृतदेह नातेवाईकांना पाठविण्यासाठी व्हेलिकी नोव्हगोरोडच्या स्थानिक अधिकार्‍यांसोबत काम करीत आहोत, असेही ते म्हणाले.