लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव

Elections-EVM-2024 आयुक्तांचे अतुलनीय योगदान

    दिनांक :07-Jun-2024
Total Views |
प्रासंगिक 
 
 
 
- विजय पांढरीपांडे
Elections-EVM-2024 नुकत्याच आपल्या देशात लोकसभेच्या निवडणुका शांतपणे पार पडल्या. हा लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव होता. ज्याची एकूणच जबाबदारी निवडणूक आयोग या केंद्रीय संस्थेवर होती. जी त्यांनी अत्यंत कुशलतेने यशस्वीपणे पार पाडली. ही एकूणच निवडणूक प्रक्रिया सोपी नसते. Elections-EVM-2024 १४४ कोटी लोकसंख्येचा अनेक राज्यांत विभागलेला आपला देश. भव्य भौगोलिक विस्तार. प्रत्येक राज्याचे प्रश्न वेगळे, अडचणी वेगळ्या, हवामान वेगळे, भूगोल वेगळा, भाषादेखील वेगळी. प्रत्येक जागेसाठी अनेक उमेदवार, म्हणजे तीही संख्या लक्षणीय. Elections-EVM-2024 अशा स्थितीत निवडणुका घोषित झाल्यापासून ते निकाल लागतपर्यंत कितीतरी टप्पे असतात. Elections-EVM-2024 आलेल्या अर्जाची छाननी करणे, आलेल्या आक्षेपांची दखल घेणे, मीडियाच्या टीकेला सामोरे जाणे, त्यातही विरोधी पक्षांच्या आक्षेपांना, टीकेला उत्तरे देणे, प्रत्येक राज्यात, प्रत्येक केंद्रावर मतदानाची सोय करणे, आवश्यक सामान हवे तिथे, हवे तेव्हा पोहोचवणे, सुरक्षेच्या दृष्टीने या तीन-चार महिन्यांच्या कालावधीत हवा तसा बंदोबस्त ठेवणे, कुठेही आक्षेपार्ह प्रकार घडू नये यासाठी दक्षता घेणे अशी लांबलचक यादी असते निवडणूक आयोगापुढे!Elections-EVM-2024 हेही वाचा : उद्यापासून महाराष्ट्रात जोरदार बरसणार...
 
 

Elections-EVM-2024 
 
 
हेही वाचा : आता अजितदादांचं काय होणार? राज्यात भूकंप? या सर्व कामात त्या त्या राज्यातील सरकारी अधिकारी, कर्मचारी यांची मदत होत असली तरी याचे एकूणच नियोजन अतिशय गुंतागुंतीचे असते. आपल्या घरचे लग्नकार्य आठवून बघा. निवडणूक आयोगाचे कौतुक अशासाठी की यावेळी कुठेही गोंधळ उडालेला दिसला नाही. चुका झाल्या नाहीत. मतदारांना त्रास झाला नाही. Elections-EVM-2024 अगदी अती वृद्ध व्यक्तींना देखील घरबसल्या मतदान करता आले. पूर्वी बुथ कॅप्चरिंगच्या घटना घडायच्या. मतपेट्या पळवून नेल्या जायच्या. नलिनी सिंग या फार जुन्या महिला पत्रकाराने त्याकाळी घेतलेला अंधाऱ्या रात्री शूट केलेला डाकूच्या मुलाखतीचा शहारे आणणारा व्हिडीओ आठवून बघा. म्हणजे आता आपण कुठून कुठपर्यंत येऊन पोहोचलो याची कल्पना येईल. या सर्व निवडणूक प्रक्रियेत टी. एन. शेषन या आयुक्तांचे अतुलनीय योगदान विसरता येणार नाही. Elections-EVM-2024 त्यांनी अक्षरशः दांडा हाती घेऊन राजकीय पक्षाच्या दबावाला बळी न पडता, सरकारला न घाबरता उत्तम सुधारणा केल्या. एकूणच निवडणूक पारदर्शी व्हावी यासाठी नवा वस्तुपाठ तयार केला. तो एक टर्निंग पॉईंट होता या लोकशाहीच्या उत्सव प्रक्रियेतला, असे म्हणायला हरकत नाही.
 
 
 
या एकूणच प्रक्रियेत निवडणूक आयोगावर अनेक दबाव येत असतात. Elections-EVM-2024 सरकारी पक्ष एकीकडे आणि विरोधी पक्ष दुसरीकडे अशी दोन्ही टोके सांभाळत तारेवरची कसरत करावी लागते आयोगाला, आयुक्तांना! पण कुणी काहीही म्हणो, तिथे पदावर कुणीही असो, आपले कर्तव्य पार पाडताना निवडणूक आयोग कधीच कमी पडत नाही. मागे महाराष्ट्रात झालेले पक्ष फोडीचे राजकारण असो, की कुणा मोठ्या नेत्याचे सदस्यत्व रद्द करण्याचा प्रश्न असो आयोग रुल बुकच्या बाहेर जाताना दिसत नाही. कुणावर पक्षपात झालाय्, असे होत नाही. तिथे नियुक्त झालेला प्रत्येक अधिकारी खंबीर असतो. निष्पक्ष असतो. व्यक्तिगत भूमिका बाजूला ठेवून नियमाप्रमाणे, कायदा पाळून निर्णय घेतो. Elections-EVM-2024 आजपर्यंत या आयोगाच्या कामकाजावर डाग लागल्याचे प्रकरण ऐकिवात नाही. हे या आयोगाचे सर्वांत मोठे यश म्हटले पाहिजे. ६४२ दशलक्ष मतदारांनी यंदा मतदानाचा हक्क बजावला. त्यात ३१२ दशलक्ष महिला आहेत. हा जागतिक विक्रम असल्याचे नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत आयोगाने सांगितले. आयोगालाच नव्हे तर आपण सर्वांना अभिमान वाटावा असे हे आकडे आहेत.
 
 
 
Elections-EVM-2024 यात एकूण बुथची संख्या, त्यातील कर्मचारी, अधिकाऱ्यांची संख्या, सुरक्षेसाठी लागणारे पोलिस अधिकारी, वाहने, मतदान यंत्रे, त्याचे प्रॉडक्शन, देखभाल, याव्यतिरिक्त मतमोजणीत एकही चूक होऊ न देता निकाल घोषित करण्याची तारेवरची कसरत हा गुंतागुंतीचा व्याप, त्याचे पॉईंट टू पॉईंट व्यवस्थापन, नियोजन हे खरेच कल्पनाशक्ती पलीकडचे आहे. देशासाठीच नव्हे तर जगासाठी लोकशाही व्यवस्थेचा हा उत्तम वस्तुपाठ आहे. अर्थात यातही सुधारणेला वाव असणारच. उदाहरणार्थ निवडणुकांच्या कामासाठी सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना कामाला जुंपतात. Elections-EVM-2024 त्यामुळे त्या त्या कार्यालयाच्या कामात व्यत्यय येतो. विशेष करून शाळेचे शिक्षक, कॉलेजचे प्राध्यापक यांना निवडणुकीचे काम दिले जाते. त्याचा परिणाम शिक्षणावर होतो. विद्याथ्र्यांचे नुकसान होते. निवडणुकीच्या काळात इतर ऑफिसची कामे देखील ठप्प झाली असतात. महत्त्वाचे सरकारी निर्णय घेता येत नाहीत. या आणि अशा प्रकारच्या समस्यांवर आयोगाने उपाय शोधले पाहिजेत. खरे तर आपल्या देशात सारख्या निवडणुका होतच असतात कुठे ना कुठे!
 
 
 
Elections-EVM-2024 तेव्हा आयोगाने या कामासाठी स्वतंत्र अधिकारी, कर्मचारी नेमावेत. त्यांना जिथे निवडणुका असतील तिथे पाठवता येईल. यामुळे रोजगार वाढेल. अनेक बेरोजगार तरुणांना काम मिळेल. अशा कामाला पदवीची नव्हे तर कौशल्य, प्रशिक्षणाची गरज असते. त्यासाठी आयोगाने स्वतंत्र ट्रेनिंग सेंटर काढावे. म्हणजे नियमित सरकारी, शैक्षणिक कामकाजाला धक्का न लावता आयोगाला आपल्याच सक्षम माणसांकडून काम करून घेता येईल. सध्या आयोगाला प्रत्येक निवडणुकीच्या वेळी नवनवीन लोकांना प्रशिक्षण द्यावे लागते. त्यात वेळ, पैसा, मनुष्यबळ वाया जाते. ते वाचेल. निवडणूक व्यवस्थापन हा ऐच्छिक विषय ठेवता येईल पदवी परीक्षेसाठी. Elections-EVM-2024 त्याद्वारे तरुण पिढीला या एकूण यंत्रणेविषयी जागरूक, सज्ञान करता येईल. तरुण मुला-मुलींना या एकूणच प्रक्रियेची माहिती होणे गरजेचे आहे. जसे आजकाल संविधानाचे पाठ शिकवले जातात तसेच लोकशाहीचा पाया असलेली निवडणूक यंत्रणा नव्या पिढीला समजली पाहिजे. कारण, या प्रक्रियेपोटी आपले कायदे करणारे सरकार, लोकसभा, विधानसभा जन्म घेतात.
 
 
 
या प्रक्रियेविषयी जनतेच्या मनात संपूर्ण विश्वास निर्माण होणे देखील तितकेच गरजेचे आहे. Elections-EVM-2024 ईव्हीएमबद्दल शंका घेणे ही आजकाल फॅशन झाली आहे. जगात शंभर टक्के परफेक्ट असे काहीही नसते. पण ज्या पद्धतीचे आरोप, शंका काही नेते विनाकारण अधूनमधून काढतात त्याला ठाम उत्तर आयोगाने द्यायला हवे. त्यासाठी ईव्हीएमची शास्त्रीय माहिती सोप्या शब्दात समजावणे, ईव्हीएममधील घोटाळा सिद्ध करणाऱ्यास बक्षीस जाहीर करणे, ही मशीन हॅक करून दाखवण्याचे जाहीर आव्हान देणे, हे संभाव्य उपाय आहेत. Elections-EVM-2024 हे सगळे असले तरी एकूणच निवडणूक आयोगाची कार्यपद्धती, व्यवस्थापन, नियोजन सारेच समूहाने टाळ्या वाजवून, उभ्याने दाद देऊन कौतुक करण्यासारखे निश्चितच आहे. लोकशाहीच्या उत्सवाचा समारोप देशासाठी देखील अभिमानास्पद आहे.
७६५९०८४५५५