वसतिगृहाच्या इमारतीला आग

    दिनांक :07-Jun-2024
Total Views |
- चौकीदाराचा मृत्यू, 42 विद्यार्थिनी सुखरूप

पुणे, 
Hostel fire : पुण्याच्या शनिपार भागात वसतिगृह असलेल्या पाच मजली इमारतीला शुक्रवारी पहाटे आग लागली. या आगीत एका चौकीदाराचा मृत्यू झाला असून, 40 हून अधिक विद्यार्थिनींना वाचवियात आले, असे अधिकार्‍यांनी सांगितले. ही घटना पहाटे दीडच्या सुमारास घडली, अशी माहिती पुणे महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी दिली. इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरील वसतिगृहात राहणार्‍या 42 विद्यार्थिनींना आग लागल्यानंतर सुखरूप बाहेर काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
PUNE-HOSTEL-IN-FIRE
 
Hostel fire : पाच मजली इमारतीत आग लागल्याचा दूरध्वनी अग्निशमन दलाला आला. आमची चमू घटनास्थळी पोहोचल्यानंतर तळमजल्यावर आग लागल्याचे दिसून आले, असे पोटफोडे यांनी सांगितले. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचेपर्यंत परिसरातील लोकांनी वसतिगृहातील विद्यार्थिनींना बाहेर काढले. तळमजल्यावर आग आटोक्यात आणली जात असताना वयाची चाळीशी गाठलेला एक व्यक्ती तेथे मृतावस्थेत आढळून आला व त्याचा मृत्यू हा भाजल्याने झालेल्या जखमांमुळे झाल्याचे दिसून येते, असेही त्यांनी सांगितले.