- शासकीय हॉस्पिटलमध्ये 9 जूनला स्वच्छता अभियान
यवतमाळ,
Mahesh Navmi : माहेश्वरी समाजाचा निर्माण दिन महेश नवमीचे आयोजन करण्यात आले आहे. माहेश्वरी समाजातर्फे 9 तारखेला स्वच्छता अभियान शासकीय हॉस्पिटल, यवतमाळ येथे सकाळी 7.30 वाजतापासून सुरू होणार आहे. सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रगण्य माहेश्वरी समाजाच्या निर्माण दिनाचे भव्यदिव्य विविध कार्यक‘माचे आयोजन माहेश्वरी मंडळाचे अध्यक्ष विजय लाहोटी व प्रकल्प प्रमुख आशिष कलंत्री (सी. ए.) यांनी या प्रसंगी विविध प्रकारचे शैक्षणिक तथा मनोरंजन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्वप्रथम समाजाचे आराध्य दैवत श्री महादेवाचे सामूहिक आयोजन महेश भवन येथे करण्यात आले आहे. 15 जून रोजी शोभा यात्रेचे आयोजन श्री रामदेव बाबा मंदिर (बायपास) येथून संध्याकाळी 5 वाजता भव्य दुचाकी रॅली निघणार व त्याचे समापन महेशभवनात होणार आहे. प्रकल्प अधिकारी दर्शन जाजू, दीपक भट्टड, रजत सिकची, राम मुंधडा, रेखा मुंधडा, ललिता राठी यांना रॅलीसाठी जबाबदारी देण्यात आली. या प्रसंगी नागपुर निवासी दिनेश तुलसीरामजी राठी (संयुक्त मंत्री मध्यांचल) प्रमुख अतिथी नंदलाल किसनलाल मुंधडा, यवतमाळ उपस्थित राहणार आहे.
Mahesh Navmi : माहेश्वरी महिला मंडळ तर्फे अतिथी व सांस्कृतिक कार्यक्रम ‘प्रभू श्रीराम के आदर्शोपर’ लघु नाटिकेचे आयोजन करण्यात आले. 8 तारखेला सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या उपस्थितीत महेशभवनातून महिला मंडळातर्फे ‘वाकेधन’ कार्यक्रमाची सुरुवात होऊन त्याचे समापन दत्त मंदिरात होणार आहे. प्रकल्प अधिकारी नयना मानधणा, नीता मानधणा राहतील. 9 तारखेला सकाळी 8 वाजता मेन हॉस्पीटल परिसर येथे माहेश्वरी समाज बांधवातर्फे स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. यासाठी प्रमुख अतिथी म्हणून वैशाली सवई, छोटू सवाई राहतील. प्रकल्प अधिकारी संजय मंत्री, डॉ. शैलेश सिकची, अनिता मुंधडा, सरोज खडलोया, हितेश राठी, अश्लेष राठी राहणार आहेत.
सोमवार, 10 तारखेला माँ तुझे प्रणाम (मातृपुजन) चे आयोजन होणार असून प्रकल्प अधिकारी संदीप सोनी, सोहन राठी, सुषमा मुंधडा, ममता चांडक, रितेश चांडक, अमित लाहोटी हे राहणार आहेत. 10 ते 14 दरम्यान बालसंस्कार शिबिराचे आयोजन शंकरलाल कोठारी शाळेत केले आहे. प्रकल्प अधिकारी अरूण अटल, अर्चना कोठारी, हरगोविंद चांडक, शिला भुतडा, डॉ. ऋषिका अटल, कुमकुम चांडक राहणार आहेत. बुधवार, 12 रोजी वय गट 10 ते 16 आणि 16 च्या वर मुलांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून प्रकल्प अधिकारी प्रियांक राठी, आकाश राठी राहणार आहेत.
Mahesh Navmi : लुडो (महिला व बालगोपाल साठी) प्रकल्प अधिकारी धीरज राठी, रोहित मुंधडा, तसेच कॅरम स्पर्धा 18 वर्षांवरील प्रकल्प अधिकारी आयुष मनिहार, सौरभ राठी हे राहणार आहेत. तसेच गुरुवार, 13 रोजी गब्रेनविटा’ या गेमचे आयोजन करण्यात आले असून प्रकल्प अधिकारी सुयश भंडारी, अनुराग मंत्री. तसेच डबल विकेट क्रिकेटचे आयोजन करण्यात आले. प्रकल्प अधिकारी श्रीकांत मुंधडा, देवांशु राठी राहणार आहेत.
शुक्रवार, 14 जून रोजी नवचेतना सन्मानाचे आयोजन प्रकल्प अधिकारी महेश करवा, कमल बागडी हे राहणार. 14 रोजी फॅन्सी ड्रेस स्पर्धा बाल कलाकारांसाठी, चिंतन मनन चर्चा प्रबोधन (विषय सोच बदला, संस्कार नाही), महेशनवमी पर्वावर आयोजित विविध कार्यक्रमांचे मार्गदर्शन बुलढाणा निवासी तुषार जगदिश दोंडीया यांच्या पर्सनॅलीटी व मोटीवेशन यांच्या उपस्थितीत होत आहे. कार्यक्रमात ‘माहेश्वरी पर्सन ऑफ दि इयर 2024’ हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून पुरस्कारप्राप्त करणार्याचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येईल.
Mahesh Navmi : तसेच माहेश्वरी मंडळाचे अध्यक्ष विजय लाहोटी, सचिव महेश मुंधडा, कोषाध्यक्ष प्रमोद धुत, माहेश्वरी महिला मंडळाची अध्यक्षा विद्या मनिहार, सचिव रजनी कलंत्री, युवा संघटनेचे अध्यक्ष वरूण भुतडा, सचिव शैलेश राठी, प्रकल्प प्रमुख आशीष कलंत्री (सि.ए.), नीलेश जाजू, मंगला भंडारी, प्रतीक धूत तसेच महेश सेवा समितीचे अध्यक्ष सुशिल कोठारी, महेश नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अरूण अटल, भोजन समितीचे मनोज भुतडा, लक्ष्मीकांत गांधी, अरविंद पनपालिया, रोशन राठी, नीलिमा बागडी, अल्का मुंधडा, गोवर्धन मुंधडा, ओमप्रकाश चांडक, श्याम राठी आणि समस्त समाज बांधव कार्यक‘मासाठी परिश्रम घेत आहेत. आपले प्रतिष्ठान 15 तारखेला 4 वाजतापासून बंद करावे व सहपरिवार महेश नवमी बाईक रॅली आणि सर्व कार्यक्रमांस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले, अशी माहिती डॉ. शैलेश सिकची यांनी दिली.