गडचिरोली-छत्तीसगड सीमेवरिल नक्षली कॅम्प उद्ध्वस्त

    दिनांक :07-Jun-2024
Total Views |
गडचिरोली, 
Naxalite camp destroyed : गडचिरोली-छत्तीसगड सीमेवरील नक्षली कॅम्प उद्ध्वस्त करीत मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य जप्त केल्याची कारवाई गडचिरोली पोलिसांनी काल, 6 जून रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास केली. प्राप्त माहितीनुसार, कसनसूर, चातगाव, टिपागड दलम आणि छत्तीसगडच्या मोहल्ला मानपूर औंधी दलमचे काही सशस्त्र माओवादी हे भिमनखोजी, नारकसा (गॅरापत्तीपासून 4 किमी उत्तरेला) जंगल परसिरात घातपात घडविण्याच्या उद्देशाने तळ ठोकून बसले असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली.
 
 
nakxli
 
Naxalite camp destroyed : त्या त्या महितीच्या आधारे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या आदेशान्वये अप्पर पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या नेतृत्वात विशेष अभियान पथक व गॅरापत्ती पोलिस तसेच सीआरपीएफच्या जवानांनी सदर जंगल परिसरात शोधमोहिम राबविली. दरम्यान, भिमनखोजी जंगल परिसरात शोधमोहिम राबवित असताना दुपारी 3 वाजताच्या सुमारास पथकातील पहिल्या गृपमधील जवानांना माओवाद्यांचा कॅम्प दिसून आला. दरम्यान पोलिस पार्टी आल्याचा सुगावा लागल्याने माओवाद्यांनी कॅम्पमधील सर्व साहित्य सोडून जंगलाचा फायदा घेत पळ काढला. घटनास्थळावरून सोलर प्लेट 1, माओवादी डांगरी (पँट) 2, पिट्टू 6 नग, चप्पज जोड 3, ताडपत्री 3, प्लॉस्टीक टेंट 2, बेल्ट 7, टेस्टर 2, पेचकस 1, शॉल 2, लुंगी 1, शर्ट 4, लोअर पँट 2, जॅकेट (हिरवा) 1, दुपट्टे (हिरवे व लाल) प्रत्येकी 1, कप 2, बेडशिट 1, स्टिल मगे 4, स्टील प्लेट 6, लायटर 2, जर्मनी गंज 2, कैची 1, मेडिकल किट, पाणी कॅन 5 आदी साहित्य मिळून आले. विशेष अभियान पथकातील सर्व पथके गडचिरोलीत सुखरूप दाखल आहेत. छत्तीसगड सिमेवर माओवाद विरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे.