धनिक बाळाच्या वडिलाच्या हॉटेलवर प्रशासनाचा बुलडोझर

    दिनांक :08-Jun-2024
Total Views |
- पोर्श कार अपघात प्रकरण
 
पुणे, 
पोर्श कार अपघात प्रकरणात आता मोठी कारवाई करण्यात आली आहे. अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवालच्या महाबळेश्वर येथील हॉटेलवर प्रशासनाचा Bulldozer on illegal hotel बुलडोझर चालला आहे. पारसी जिमखान्याच्या जागेवर बेकायदेशीरपणे बांधलेल्या हॉटेलवर स्थानिक प्रशासनाने ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 
Porsh
 
प्रत्यक्षात आठवडाभरापूर्वी प्रशासनाने Bulldozer on illegal hotel अवैध हॉटेल सील केले होते, त्यानंतर आता त्यावर कारवाई करण्यासाठी बुलडोझरचा वापर करण्यात आला आहे. पुण्यातील कल्याणीनगर भागात 19 मे रोजी एका अल्पवयीन मुलाने दुचाकीवरून प्रवास करणार्‍या दोन आयटी व्यावसायिकांना भरधाव पोर्श कारने धडक दिली होती, ज्यामुळे त्या दोघांचा मृत्यू झाला होता. याआधीही महाराष्ट्र पोलिसांनी या प्रकरणी अनेक एफआयआर नोंदवले आहेत.