आंध्रप्रदेशात मुस्लिम आरक्षण कायम राहणार

    दिनांक :08-Jun-2024
Total Views |
- शपथविधीपूर्वी चंद्राबाबू नायडूंची घोषणा
 
अमरावती, 
आंध्रप्रदेशात मागील सरकारने मुस्लिमांना दिलेले आरक्षण नवीन सरकार कायम ठेवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी तेदेपाचे प्रमुख Chandrababu Naidu चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे. आमचा मुस्लिम आरक्षणाला विरोध नाही. त्यांना शिक्षण व नोकरीतील आरक्षण पुढेही सुरूच राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
 
Chandrababu Naidu
 
वृत्तसंस्थेची बोलताना नायडू म्हणाले, आम्ही आंध्रप्रदेशातील मुस्लिम आरक्षण सुरूच ठेवणार आहे. यात कसलीही समस्या नाही. भलेही आमचा सहकारी पक्ष असलेल्या भाजपाने धर्माच्या आधारावर आरक्षण न देण्याचा दावा केला असला, तरी मात्र आपला पक्ष आंध‘प्रदेशात मुस्लिम आरक्षण कायम ठेवणार आहे. मोदी यांनी प्रचारसभेतून दलित, आदिवासी आणि ओबीसींचा कोटा मुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर देणार नसल्याचे म्हटले होते. नायडू यांचा पक्ष रालोआचा भाग आहे. केंद्रात Chandrababu Naidu नायडू यांनी मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठी समर्थन दिले आहे. आंध‘प्रदेशात सत्तास्थापनेसाठी भाजपाचे नायडूंना समर्थन आहे. अशात मुस्लिम आरक्षणाला समर्थन देणारी नायडू यांची घोषणा पुढील काळात भाजपासाठी अडचणीचे ठरू शकते, असे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.